• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress mrinal kulkarni reveals her fitness secret know about it rnv

“सोनपरी ते सुभेदार…तुम्ही आहात तशाच आहात,” अखेर मृणाल कुलकर्णींनी सांगितलं त्यांचं फिटनेस सिक्रेट, म्हणाल्या…

तुम्ही गेली अनेक वर्षं आहात तशाच आहात, अशा कॉम्प्लिमेंट्स त्यांना नेहमी मिळत असतात. आता त्यांनी यामागचं गुपित उघड केलं आहे.

August 19, 2023 18:03 IST
Follow Us
  • अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत.
    1/18

    अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत.

  • 2/18

    गेली अनेक वर्षं त्या विविध माध्यमांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

  • 3/18

    त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. 

  • 4/18

    त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या फिटनेसमुळेही नेहमीच चर्चेत असतात.

  • 5/18

    तर आता त्यांनी त्यांचं फिटनेस सिक्रेट सांगितलं आहे.

  • 6/18

    मृणाल कुलकर्णी लवकरच ‘सुभेदार’ या चित्रपटात जिजाबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

  • 7/18

    दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन करत आहे. 

  • 8/18

    याच निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली.

  • 9/18

    यावेळी मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य उघड केलं.

  • 10/18

    “तुमच्या फिटनेसचं रहस्य काय?” असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “शिवराज अष्टकाचा भाग झालं की फिट रहायलाच लागतं.”

  • 11/18

    “दिग्पाल पहाटे साडेतीन वाजता उठवतो काय, एखादाच सीन का होईना पण तलवारबाजीचा देतो, त्याचा सराव करायला लावतो.”

  • 12/18

    “अजून पुढचे तीन चित्रपट होईपर्यंत तर फिटनेस ठेवायलाच लागणार आहे.”

  • 13/18

    “पण गमतीचा भाग सोडला तर आपल्या सर्वांनाच आपल्या फिटनेसचं रहस्य माहित असतं.”

  • 14/18

    “जे करायला हवं ते करायचं आणि जे करायला नको ते नाही करायचं म्हणजे तुम्ही फिट राहता.”

  • 15/18

    मृणाल कुलकर्णी यांचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे.

  • 16/18

    दरम्यान, त्यांचा सुभेदार हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. 

  • 17/18

    या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

  • 18/18

    या चित्रपटात मृणाल कुलकर्णी यांच्याबरोबरच चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर, विराज कुलकर्णी, शिवानी रांगोळे, स्मिता शेवाळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movieमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Actress mrinal kulkarni reveals her fitness secret know about it rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.