-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते.
-
‘जुळून येती रेशीमगाठी’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे प्राजक्ता माळी प्रसिद्धीझोतात आली.
-
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या नव्या फोटोशूटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
वेस्टर्न सूटमध्ये प्राजक्ता फारच सुंदर दिसत आहे. या फोटोंना खास कॅप्शन देत अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
“माझ्या फोनची रिंगटोन इंग्रजी गाण्याची आहे आणि फोनच्या रिंगटोन इच्छेनुसार मी वारंवार बदलत असते” असा खुलासा प्राजक्ताने कॅप्शनमध्ये केला आहे.
-
पुढे, अभिनेत्री तिच्या चाहत्यांना विनंती करत लिहिते, “आता मराठी गाणं रिंगटोनला का नाही? यावर कमेंट्समध्ये चर्चा नको.”
-
“आपलीच मराठी मुलगी प्राजक्ता माळी”, असं तिने कॅप्शनच्या शेवटी नमूद केलं आहे.
-
प्राजक्ताने लिहिलेल्या हटके कॅप्शनचं आणि फोटोशूटचं तिच्या चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.
-
दरम्यान, अभिनेत्री लवकरच ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटात झळकणार आहे.
“…यावर चर्चा नको”, प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोशूटची चर्चा, चाहत्यांना विनंती करत म्हणाली…
“आपलीच मराठी मुलगी”, प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोशूटने वेधलं लक्ष
Web Title: Prajakta mali new photoshoot in western outfit her instagram caption got attention sva 00