-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच तिचा वाढदिवस हास्यजत्रेच्या कलाकारांबरोबर कर्जत येथील फार्महाऊसवर साजरा केला.
-
प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्त हास्यजत्रेतील सगळे विनोदवीर तिच्या कर्जत येथील ‘प्राजक्तकुंज’ या फार्महाऊसवर गेले होते.
-
प्राजक्ताच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ अभिनेत्री वनिता खरातने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
तसेच अभिनेत्री प्राजक्ताने माळीने सुद्धा हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.
-
वनिता खरात या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिते, “प्राजक्ताने फार्महाऊस घेतलं आणि आम्ही तिथे पार्टी करायला गेलो नाही, ऐसा हो नहीं सकता! प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर आम्ही खूप धमाल मस्ती केली.”
-
निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त ‘प्राजक्तकुंज’ बंगला आणि स्विमिंग पूलमध्ये कलाकारांनी केलेली मजा याची झलक वनिताच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
-
यावेळी समीर चौघुले यांनी अभिनेत्रीचं औक्षण केलं.
-
अमित फाळके, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, सचिन गोस्वामी, समीर चौघुले, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, सचिन मोटे, ओंकार राऊत अशी हास्यजत्रेची संपूर्ण टीम प्राजक्ताच्या फार्महाऊसवर उपस्थित होती.
-
दरम्यान, प्राजक्ताला वाढदिवसाची भेटवस्तू म्हणून या संपूर्ण टीमने फोटोफ्रेम गिफ्ट केली आहे.
प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर पोहोचले हास्यजत्रेचे कलाकार, दणक्यात केलं सेलिब्रेशन, पाहा फोटो
हास्यजत्रेच्या कलाकारांनी प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर केली धमाल, वनिता खरातने शेअर केले फोटो
Web Title: Prajakta mali birthday celebration with maharashtrachi hasya jatra team at karjat farmhouse see photos sva 00