-
ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब जिंकला आणि नंतर ती सिनेमासृष्टीकडे वळली. कुणी सांगेल की ऐश्वर्याचा पहिला सिनेमा आ अब लौट चले होता. पण तो तिचा पहिला सिनेमा नव्हता.
-
ऐश्वर्याने एका दाक्षिणात्य सिनेमातून पदार्पण केलं होतं. त्या सिनेमात तिचा लुक खूपच वेगळा होता.
-
ऐश्वर्या रायने १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला. त्यानंतर १९९७ मध्ये ऐश्वर्याने मणिरत्नमचा सिनेमा इरुवर मधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमातला ऐश्वर्या रायचा लुक अत्यंत निरागस होता. हा त्याच सिनेमातला फोटो आहे त्यावरुन तुम्हाला हे लक्षात आलं असेलच.
-
ऐश्वर्याचा एकदम निरागस आणि तितकाच सुंदर लुक
-
ऐश्वर्या रायने आपल्या पहिल्या सिनेमात चौदा वर्षांनी मोठ्या असलेल्या मोहनलाल बरोबर काम केलं.
-
आ, अब लौट चले, और प्यार हो गया, जीन्स या सिनेमांमधूनही तिने काम केलं. मात्र तिचा पहिला सुपरहिट सिनेमा होता तो हम दिल दे चुके सनम
-
हम दिल दे चुके सनम या सिनेमामुळे ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्यातल्या केमिस्ट्रीचीही चर्चा रंगली होती. मात्र नंतर या दोघांचं ब्रेक अप झालं. ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केलं आहे.
-
ऐश्वर्या राय ही आजही खूपच सुंदर दिसते आणि फॅशन दिवा म्हणून ओळखली जाते.
-
ऐश्वर्याचा आणखी एक खास आणि तितकाच मोहक लुक
