-
अभिनेत्री विशाखा सुभेदार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फुबाईफू’ या छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रमांतून घराघरांत पोहोचली.
-
विनोदाचं अचूक टायमिंग आणि दमदार अभिनयाच्या जोरावर विशाखाने असंख्य प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
विशाखा सुभेदारने नुकत्याच एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.
-
या वेळी अभिनेत्रीने तिला सिग्लवर भेटलेल्या तृतीयपंथीयांचा भावनिक किस्सा सांगितला.
-
एके दिवशी घरात भांडण झाल्यावर विशाखा शूटिंगला जाण्यासाठी निघाली. तेव्हा अभिनेत्रीने नुकतीच नवीन कार खरेदी केली होती. अशातच सिग्नलवर एका तृतीयपंथीयाने विशाखाकडे पैसे मागितले. परंतु, पर्स घरी विसरल्यामुळे अभिनेत्रीकडे पैसे नव्हते.
-
सिग्नलवर घडलेला हा भावनिक प्रसंग सांगताना विशाखा म्हणते, “सिग्नलवर उभ्या असलेल्या एका तृतीयपंथीयाने मला पाहिलं आणि ‘पैसा दे पैसा दे…’ असं म्हणत तो माझ्याजवळ आला.”
-
अभिनेत्री पुढे म्हणाली, “गाडीची काच खाली करून रडलेल्या अवस्थेत माझ्याकडे पैसे नसल्याचं मी त्याला सांगितलं. तेव्हा त्या तृतीयपंथीयाने माझ्या डोळ्यात पाणी पाहिलं अन् म्हणाला, ‘चल कुछ नहीं तेरे आँखो मैं जो ऑंसू है वो मुझे दे…’ त्या क्षणाला मी खुदकन हसले आणि पुढे निघाले.”
-
“माझ्याबद्दल काहीतरी आपुलकी वाटल्याशिवाय त्याने मला असं उत्तर दिलं नसतं. माझ्या आयुष्यातील हा अतिशय सुंदर अनुभव होता. जो माझ्या कायम लक्षात राहणार.” असं विशाखा सुभेदारने सांगितलं.
-
दरम्यान, अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या ‘शुभविवाह’मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : विशाखा सुभेदार इन्स्टाग्राम )
“तृतीयपंथीयाने माझ्या डोळ्यात पाणी पाहिलं अन्…”, विशाखा सुभेदारने सांगितला भावुक अनुभव; म्हणाली, “त्या क्षणाला…”
अभिनेत्री विशाखा सुभेदारने सांगितला भावनिक किस्सा, म्हणाली…
Web Title: Actress vishakha subhedar shared emotional incidence of her personal life sva 00