-
शाहरुख खान हा बॉलिवूडसह देशातला मोठा सुपरस्टार आहे. ३४ वर्षांपासून अधिक काळ चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या शाहरुखने भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली आहे. शाहरुख खान हा भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. (Photo: SRK Fan Club/fb)
-
शाहरुख खान त्याच्याकडे असलेल्या पैशांचा आनंद घेतो. तो आलिशान आयुष्य जगतो. (Photo: SRK Fan Club/fb)
-
शाहरुखने त्याच्या मुलांवरही उदार मनाने भरपूर खर्च केला आहे. मग ती मुलांची जीवनशैली असो, अथवा त्यांचं शिक्षण.(Photo: SRK Fan Club/fb)
-
शाहरुखला तीन मुलं आहेत. सुहाना, आर्यन आणि अबराम अशी तिन्ही मुलांची नावं आहेत. सुहानाने मुंबई, लंडन आणि अमेरिकेत शिक्षण घेतलं आहे. (Photo: SRK Fan Club/fb)
-
सुहाना खानने तिचं शालेय शिक्षण मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं. तिथळी फी प्रतिवर्षी ७ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. (फोटो: सुहाना खान इंस्टाग्राम)
-
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर सुनाहा लंडनला गेली आणि तिथल्या अर्डिंगले कॉलेजच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकू लागली. तिथली फी एका टर्मसाठी १४ हजार पौंड (१४ लाख रुपये) आहे. (Photo: SRK Fan Club/fb)
-
२०१९ मध्ये सुहाना खानने अमेरिकेतील टिश स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजच्या पहिल्या वर्षाची फी ५ हजार डॉलर्स, दुसऱ्या वर्षाची १५ हजार डॉलर्स आणि तिसऱ्या वर्षाची फी १५ हजार डॉलर्सपेक्षा जास्त आहे. (Photo: SRK Fan Club/fb)
शाहरुख खानने मुलगी सुहानाच्या शिक्षणावर खर्च केलेत ‘इतके’ पैसे, तुमचा विश्वास बसणार नाही
शाहरुख खानने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दिलदारपणे पैसे खर्च केले आहेत. त्याची मुलगी सुहाना खानच्या शिक्षणावरील खर्च पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो.
Web Title: Jawan actor shahrukh khan spent huge amount of money on daughter suhana khan education jshd import asc