-
नाटक, चित्रपट, राजकारण या सगळ्यांमध्ये सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे.
-
प्रिया बेर्डे यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवला.
-
प्रिया बेर्डे या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात.
-
नुकतंच त्यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. याचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
प्रिया बेर्डे यांनी कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग ,केसरी वाडा, श्रीमंत दगडूशेठ गणपती, मंडई गणपती, भाऊ रंगारी या गणपतींचे दर्शन घेतले.
-
“आज मी पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे दर्शन घेतले.”
-
“गेली अनेक वर्षे या सर्व गणपतींचे दर्शन घ्यावे असं वाटत होतं तो योग आज आला.”
-
“काय कमाल वातावरण होतं, अख्ख पुणे गणपतीमय झालंय.”
-
“यावर्षी गणेशाचे देखावे जास्तीत जास्त मंदिरांच्या प्रतिकृती आहेत, सगळ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन एकट्या पुण्यात मिळाले”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
प्रिया बेर्डे यांच्या गणपती दर्शनाचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यांच्या या फोटोवर लाईक्सचाही पाऊस पडताना पाहायला मिळत आहे.
“सगळ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन एकट्या पुण्यात मिळाले”, प्रिया बेर्डेंनी शेअर केले गणपती दर्शनाचे फोटो
प्रिया बेर्डे यांच्या गणपती दर्शनाचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहे.
Web Title: Marathi actress prreeya berde visit pune ganpati festival photos nrp