-
सध्या बॉलिवूड स्टार्स आणि सोशल मीडिया हे समीकरण फारच लोकप्रिय झालेलं आहे. एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचा सोशल मीडियावरील वावर कसा आहे हे पाहुनच त्यांना ठराविक चित्रपटासाठी विचारलं जातं.
-
सध्याच्या इंडस्ट्रीतील बहुतेक सगळ्याच नायिका या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय आहेत अन् त्यातून त्या वेगवेगळे उद्योगही करत आहेत.
-
असं असलं तरी याच बॉलिवूडमधले काही असे कलाकार आहेत जे या काळातही सोशल मीडियापासून बरेच लांब आहे. त्यांच्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत.
-
पुढचा सुपरस्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो रणबीर कपूर कायम चर्चेत असतो, पण रणबीर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत नाही.
-
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानदेखील कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आढळणार नाही, सैफला मोबाइलपेक्षा पुस्तकांच्या सानिध्यात राहायला आवडतं असं मध्यंतरी त्याची पत्नी करीना कपूरनेच सांगितलं होतं.
-
नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नी अन् नावाजलेल्या अभिनेत्री रत्ना पाठक शाह या सुद्धा सोशल मीडियापासून लांब आहेत, पण आपल्या पतीप्रमाणे कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे त्या बऱ्याचदा चर्चेत असतात.
-
आजही प्रेक्षक जिच्या सौंदर्यावर जीव ओवाळून टाकतात अशा रेखा यासुद्धा सोशल मीडियाचा वापर अजिबात करत नाहीत, जर रेखा या सोशल मीडियावर आल्या तर नव्या अभिनेत्री आणि मॉडेलचं काही खरं नाही हे मात्र नक्की.
-
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात, याउलट त्यांच्या पत्नी व सुप्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन या शक्य होईल तितकं या गोष्टीपासून स्वतःला लांब ठेवत असतात.
-
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानलासुद्धा सोशल मीडियाची एलर्जि आहे, कित्येक चाहत्यांनी विनवणी केली पण आमिर खान काही केल्या सोशल मीडियावर यायला तयार नाही. (फोटो सौजन्य : सेलिब्रिटीजचे फेसबुक पेज)
फेसबुक, इंस्टाग्रामच्या जमान्यातसुद्धा ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटीज सोशल मीडियापासून आहेत कोसो दूर
सध्याच्या इंडस्ट्रीतील बहुतेक सगळ्याच नायिका या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय आहेत
Web Title: These bollywood celebrities are not on any social media platform avn