-
अभिनेत्री रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित यांनी ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.
-
रेणुका शहाणे ‘कोण होणार करोडपती’मध्ये काही महिन्यांपूर्वी पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी ‘हम आपके है कौन’च्या सेटवरील काही आठवणी सांगितल्या.
-
“‘हम आपके है कौन’च्या सेटवर माधुरीने प्रचंड मदत केली आणि मला सांभाळून घेतलं” असं रेणुका शहाणे यांनी सांगितलं.
-
शूटिंग दरम्यानचा किस्सा सांगताना त्या म्हणतात, “त्या काळात महिलांना पुरेशा सुविधा उपलब्ध व्हायच्या नाहीत. आऊटडोअर शूट करताना सेटवर स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने आम्ही मुली दिवसभर पाणीच प्यायचो नाही.”
-
“तू असं करू नकोस…जर दिवसभर पाणी प्यायली नाहीस, तर तुझ्या चेहऱ्याची वाट लागेल असा सल्ला मला तेव्हा माधुरीने दिला होता कारण, तिला स्किनचा प्रचंड व्हायचा.” असं रेणुका शहाणेंनी सांगितलं.
-
माधुरीने माझी प्रचंड काळजी घेतल्याने मला ‘हम आपके है कौन’च्या सेटवर छान वाटायचं असंही रेणुका यांनी आवर्जून नमूद केलं.
-
माधुरी दीक्षित रेणुका शहाणेंना सेटवर प्रेमाने ‘शहाणी’ या नावाने हाक मारायची.
-
दरम्यान, ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट ५ ऑगस्ट १९९४ रोजी प्रदर्शित झाला होता.
-
रेणुका शहाणे यांनी चित्रपटात माधुरीच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती.
“स्वच्छतागृहांची व्यवस्था नव्हती अन्…”, ‘हम आपके है कौन’च्या सेटवर रेणुका शहाणेंना माधुरीने दिला होता ‘तो’ सल्ला
‘हम आपके है कौन’ च्या सेटवर ‘असं’ होतं माधुरीने दीक्षित आणि रेणुका शहाणेंचं बॉण्डिंग…
Web Title: Renuka shahane shared memories of hum aapke hai kaun with madhuri dixit sva 00