-
अभिनेत्री श्वेता तिवारी चित्रपट आणि मालिकांसह तिच्या लूकमुळे खूप चर्चेत असते.
-
श्वेता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्याची एकही संधी ती सोडत नाही.
-
४२ वर्षाच्या श्वेताला एक २५ वर्षांची मुलगी आहे. तिची मुलगी पलक ही सुद्धा इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून काम करते.
-
श्वेताच्या फिटनेस आणि ग्लॅमरसमोर चाहते नेहमीच पलकची खिल्ली उडवताना दिसतात.
-
श्वेता तिवारी ही पलक तिवारीची आई नव्हे तर मोठी बहीण वाटते असं बऱ्याचदा चाहते कॉमेंटदेखील करतात.
-
श्वेताच्या सोशल मीडियावरील फोटोंची प्रचंड चर्चा होत असते.
-
नुकतंच श्वेताने एक बोल्ड फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं.
-
हॉट लाल आऊटफिटमधला जबरदस्त बोल्ड लुक श्वेताने शेयर केला आहे. यात ती कमालीची बोल्ड दिसत आहे. या वयातही तिच्या फिटनेसचं सगळेच कौतुक करत आहेत.
-
नेहमीप्रमाणेच श्वेताचा हा बोल्ड सेक्सी अंदाज पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत व सवयीप्रमाणे त्यांनी या फोटोवरही श्वेताची मुलगी पलकला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
-
“मुलीच्या पोटावर पाय देऊ नकोस” किंवा “तू असे फोटोज टाकले तर मुलीला काम कसं मिळणार इंडस्ट्रीत?” अशा कॉमेंट करत नेटकऱ्यांनी श्वेताची प्रशंसा केली आहे.
-
इतकंच नव्हे तर श्वेताचा हा बोल्ड अवतार पाहून काहींनी तर श्वेताला ‘कामसूत्र क्वीन’ असंही म्हंटलं आहे. एकूणच तिचं हे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. (फोटो सौजन्य : श्वेता तिवारी / इंस्टाग्राम पेज)
“मुलीच्या पोटावर पाय देणार का?” श्वेता तिवारीचं जबरदस्त बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांनी केला सवाल
हॉट लाल आऊटफिटमधला जबरदस्त हॉट लुक श्वेताने शेयर केला आहे. यात ती कमालीची बोल्ड दिसत आहे
Web Title: Shweta tiwari bold photoshoot viral on instagram people started trolling palak tiwari avn