-
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरांत लोकप्रिय झाली.
-
‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे सूत्रसंचालिका म्हणून तिला एक वेगळी ओळख मिळाली.
-
प्राजक्ता नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत असते.
-
सध्या अभिनेत्रीच्या अशाच एका फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
गुलाबी रंगाच्या या भरजरी घागऱ्यामध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.
-
तब्बल १२ किलोंचा घागरा घालून प्राजक्ताने हे सुंदर फोटोशूट केलं आहे.
-
प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या फोटोंना लक्ष वेधून घेणारं कॅप्शन देत असते.
-
या नव्या फोटोंना कॅप्शन देत अभिनेत्री लिहिते, “मूड मूड के सोडा…समोर बघूनही नीट चालता येत नव्हतं, हा घागरा तब्बल १०-१२ किलोंचा होता…पण होता सुंदर.”
-
दरम्यान, प्राजक्ता माळीच्या या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
तब्बल १२ किलोंचा घागरा घालून प्राजक्ता माळीचं हटके फोटोशूट! म्हणाली, “मला नीट…”
प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोशूटची चर्चा, अभिनेत्रीच्या भन्नाट कॅप्शनने वेधलं लक्ष…
Web Title: Actress prajakta mali wear 12 kilo ghagra for her new photoshoot sva 00