-
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
‘मुरांबा’ या लोकप्रिय मालिकेतून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
शशांकने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे.
-
मराठीसह आता तो हिंदी सिनेसृष्टीतही पाहायला मिळत आहे.
-
हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम २००३’ (Scam 2003) या वेब सीरिजमध्ये शशांक झळकला होता.
-
लवकरच शशांक प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या वेब सीरिजमध्येही पाहायला मिळणार आहे.
-
अशा या लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आणि एक किस्सा सांगितला.
-
नुकताच अभिनेता शशांक केतकरने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्याबरोबर रॅपिड फायर खेळ खेळण्यात आला.
-
रॅपिड फायर खेळ खेळताना शशांकला विचारलं गेलं की, पहिल्यांदा आईच्या हातचा खालेला मार आठवतोय का? याच प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्याने बालपणीचा किस्सा सांगितला.
-
शशांक म्हणाला, “हो मला अगदीच आठवतंय. मी लहानपणी ताक प्यायचो नाही. आईने मला सक्तीच केली होती, ताक प्यायचं नाहीतर मी तुझ्या डोक्यावर ओतेन.”
-
पुढे शशांक म्हणाला, “यावरून मी आईला खूप त्रास दिला होता. मी निर्लज्ज सारखं म्हणाला होतो, मी नाही पिणार. तर माझ्या हुशार आईने थेट मला बाथरुममध्ये नेलं आणि ताक ओतलं. म्हणजे तिचा पुसायचा त्रास कमी झाला.”
-
यानंतर शशांकला ताक का आवडत नव्हतं असं विचारलं. तेव्हा तो म्हणाला, “लोणी वगैरे जिभेला आणि टाळूला लागतं, त्यामुळे मला ताक आवडतं नव्हतं. पण आता मी ताक पितो. दुधाचे सगळेच पदार्थ मला आवडतात.”
“ताक आवडत नव्हतं म्हणून आईने थेट बाथरुममध्ये नेलं अन्…”; शशांक केतकरने सांगितला ‘तो’ किस्सा
अभिनेता शशांक केतकरने सांगितलेला ‘हा’ किस्सा वाचा…
Web Title: Actor shashank ketkar share his childhood story of buttermilk pps