• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. how animal actress tripti dimri became national crush do you know her journey avn

‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरसह इंटीमेट सीन देणारी तृप्ती डिमरी रातोरात बनली नॅशनल क्रश; जाणून घ्या अभिनेत्रीचा प्रवास

या चित्रपटात रणबीरबरोबरची तिची केमिस्ट्री आणि त्यातले तिचे बोल्ड सीन्स चांगलेच चर्चेत आहेत

December 4, 2023 17:49 IST
Follow Us
  • Triptidimri8
    1/18

    ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. बॉबी देओलचा क्रूर खलनायक, रणबीरचा जबरदस्त अंदाज, रश्मिकाची डायलॉग डिलिव्हरी यांच्याबरोबरीनेच यातील आणखी एका अभिनेत्रीची जबरदस्त चर्चा होत आहे ती म्हणजे तृप्ती डिमरीची.

  • 2/18

    ‘अ‍ॅनिमल’मध्ये एका इन्फॉर्मरची भूमिका निभावणाऱ्या तृप्ती डिमरीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

  • 3/18

    या चित्रपटात रणबीरबरोबरची तिची केमिस्ट्री आणि त्यातले तिचे बोल्ड सीन्स चांगलेच चर्चेत आहेत. रणबीरबरोबरचा तिचा इंटीमेट सीन सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे.

  • 4/18

    यानंतर सोशल मीडियावर तृप्ती डिमरीच्या फॉलोवर्स मध्ये दुपटीने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 5/18

    तृप्ती आणि रणबीरची केमिस्ट्री पाहून बरेच सिंगल लोक निराश झाले असल्याचे मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 6/18

    याबरोबरच तृप्तीला नॅशनल क्रश म्हणूनदेखील जाहीर करायला हवं असे मीम्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे.

  • 7/18

    रातोरात एका चित्रपटातील छोट्याश्या भूमिकेमुळे चर्चेत आलेली ही तृप्ती डिमरी आहे तरी कोण? त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

  • 8/18

    तृप्ती डिमरीने २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मॉम’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

  • 9/18

    श्रीदेवी व नवाझुद्दीन यांच्याबरोबरीनेच ती ‘मॉम’मध्ये छोट्या भूमिकेत दिसली होती.

  • 10/18

    यानंतर तृप्तीने सनी देओल, बॉबी देओल व श्रेयस तळपदे यांच्या ‘पोस्टर बॉइज’ या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही काम केलं.

  • 11/18

    परंतु इम्तियाज अलीच्या ‘लैला मजनू’ या चित्रपटातून तृप्तीला खरी ओळख मिळाली.

  • 12/18

    या चित्रपटात तृप्ती मुख्य भूमिकेत दिसली होती.

  • 13/18

    चित्रपटांबरोबरच तृप्तीने ओटीटी विश्वातही चांगली कामगिरी केलेली आहे.

  • 14/18

    नेटफ्लिक्सच्या ‘बुलबुल’ आणि ‘कला’ या दोन्ही चित्रपटांमध्ये तृप्ती मुख्य भूमिकेत दिसली.

  • 15/18

    दोन्हीमध्ये तृप्तीच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.

  • 16/18

    तृप्ती डिमरी ही अभिनेत्री अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेशबरोबर रिलेशनशिपमध्ये होती.

  • 17/18

    नुकतंच त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. ब्रेकअप नंतर दोघांनी एकमेकांना अनफॉलोदेखील केलं व एकेमकांबरोबरचे फोटोजही डिलीट केले.

  • 18/18

    ‘अ‍ॅनिमल’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटातून आता तृप्तीला चांगलाच मोठा ब्रेक मिळाला आहे, याचा फायदा तिच्या अॅक्टिंग करिअरमध्ये नक्कीच होऊ शकतो. (फोटो सौजन्य : तृप्ती डीमरी – इंस्टाग्राम पेज व सोशल मीडिया)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: How animal actress tripti dimri became national crush do you know her journey avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.