-
रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. संदीप रेड्डी वांगा यांचा हा एक हिंसक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. जबरदस्त अॅक्शनसह या चित्रपटात खूप रक्तपातही पाहायला मिळत आहे. अॅनिमलच्या आधीही बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत ज्यात हिंसक दृश्ये दाखवण्यात आली आहेत. जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल. (Still From Film)
-
Raman Raghav 2.0 : या चित्रपटात खून आणि लैंगिक हिंसाचाराची अनेक दृश्ये आहेत जी खूपच भयानक आहेत. या चित्रपटात सीरियल किलरची कथा दाखवण्यात आली आहे. (Still From Film)
-
Ajji : या चित्रपटात १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार होतो, त्यानंतर तिला न्यायदेखील मिळत नाही. त्यामुळे मुलीची आजी गुन्हेगारांचा बदला घेते. या चित्रपटात सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत हिंसक दृश्ये दाखवली आहेत जी खूप अस्वस्थ करणारी आहेत. (Still From Film)
-
Anjaam : या चित्रपटात शाहरुख खान नकारात्मक भूमिकेत आहे. ‘अंजाम’मध्ये महिलांवरील अत्याचाराची अनेक दृश्ये दाखवण्यात आली आहेत. (Still From Film)
-
Bandit Queen : फुलन देवीच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची गणना सर्वाधिक हिंसक दृश्ये असलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये केली जाते. (Still From Film)
-
Matrubhoomi : या चित्रपटात सासरच्या मंडळींकडून होणारा सुनेचा छळ दाखवण्यात आला आहे. या चित्रपटातला लैंगिक हिंसाचार पाहून प्रेक्षकही हादरले होते. (Still From Film)
-
The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘दी काश्मिर फाईल्स’ चित्रपटात काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचे चित्रण करणारी दृश्ये आहेत, जी पाहताना खूप वेदना होतात. (Still From Film)
-
Titli : कनू बहल दिग्दर्शित ‘तितली’ या चित्रपटात क्रूरता आणि छळाचे अत्यंत भयानक चित्रण असलेली काही दृश्ये आहेत. (Still From Film)
Animal पूर्वी ‘या’ बॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवलीय भयानक हिंसा, पाहून प्रेक्षकही हादरलेले
हिंसा हा विषय अनेकदा सिनेमात दाखवला जातो. बॉलीवूड चित्रपटांमध्येही हिंसाचाराची अनेक दृश्ये पाहायला मिळतात. असे काही चित्रपट आहेत ज्यात हिंसाचाराची मर्यादा ओलांडली आहे. या चित्रपटांमध्ये दाखवलेली हिंसा इतकी भीषण आहे की ती पाहून प्रेक्षकही हादरतात.
Web Title: Before animal horrific violence seen in these 7 bollywood films jshd import asc