-
८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रती अग्निहोत्रींनी बॉलीवूड इंडस्ट्रीत आपली खास ओळख निर्माण केली होती. ६३ वर्षीय अभिनेत्रीने वयाच्या १६ व्या वर्षी दाक्षिणत्य चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली.
-
१९७९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पुडिया वरपुकल’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाच्या यशानंतर त्याला आणखी चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.
-
अभिनेत्रीने १९८१ मध्ये ‘एक दुजे के लिए’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर अभिनेत्रीकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली.
-
दाक्षिणात्य ते बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावणाऱ्या अभिनेत्री रती अग्निहोत्री करिअरच्या शिखरावर होत्या, तेव्हा त्यांनी बिझनेसमन अनिल वीरवानीशी १९८५ मध्ये लग्न केलं.
-
लग्नानंतर पती अनिल वीरवानीने त्यांच्यावर चित्रपटात काम न करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. लग्नाच्या एका वर्षानंतर अभिनेत्रीने मुलगा तनुजला जन्म दिला.
-
मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्यात आनंदाऐवजी भांडण चालू झालं. कदाचित याच कारणामुळे लग्नाच्या चार वर्षानंतर अभिनेत्रीने जवळपास १३ वर्षांच्या करिअरमधून ब्रेक घेतला होता.
-
रती आणि त्यांच्या पतीतील भांडण कालांतराने खूप वाढले. रती यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांनी तब्बल ३० वर्षे घरगुती हिंसाचार सहन केला.
-
त्यांनी असंही म्हटलं होतं की त्या ३० वर्षे फक्त मुलगा तनुजसाठी गप्प राहिल्या, कारण त्यांना मुलाला भांडणापासून दूर ठेवायचे होते.
-
२०१५ मध्ये रती अग्निहोत्रींनी पती अनिल विरवानी यांच्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. यासोबतच त्यांनी पतीविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल करून घटस्फोट घेतला होता.
(फोटो : इंडियन एक्सप्रेस)
अभिनेत्रीने यशाच्या शिखरावर असताना केलं लग्न, तब्बल ३० वर्षे सहन केला पतीचा अत्याचार अन् २०१५ मध्ये…
अभिनेत्रीने करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटांमधून केली, त्यानंतर १९८१ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने बिझनेसमन अनिल विरवानीशी लग्न केलं, पण…
Web Title: Happy birthday rati agnihotri career personal life divorced husband anil virwani after 30 years of marriage jshd import hrc