• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress triptii dimri reaction on intimate scene in animal movie with ranbir kapoor sva

“रणबीर दर ५ मिनिटांनी…”, ‘अ‍ॅनिमल’मधील इंटिमेट सीन कसे शूट करण्यात आले? तृप्ती डिमरीने सांगितला सेटवरचा अनुभव

अभिनेत्री तृप्ती डिमरी सांगितला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव, म्हणाली…

December 11, 2023 20:15 IST
Follow Us
  • triptii dimri reaction on intimate scene in animal movie
    1/15

    रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.

  • 2/15

    संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • 3/15

    या मुख्य कलाकारांशिवाय ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे आणखी एक अभिनेत्री प्रसिद्धीझोतात येऊन रातोरात नॅशनल क्रश झाली ती म्हणजे तृप्ती डिमरी.

  • 4/15

    ‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित झाल्यावर तृप्तीच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

  • 5/15

    तिने या चित्रपटात ‘झोया’ ही भूमिका साकारली आहे.

  • 6/15

    ‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित झाल्यावर तृप्ती आणि रणबीर कपूरच्या इंटिमेट सीनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली.

  • 7/15

    यावर अभिनेत्रीने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अशाप्रकारचे इंटिमेट सीन सेटवर कसे शूट केले जातात याबद्दल देखील तिने सांगितलं.

  • 8/15

    ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने आधीच कल्पना दिल्याचं तृप्तीने या मुलाखतीत सांगितलं.

  • 9/15

    तसेच या सीन्सबद्दल काहीच अडचण नसेल, तरच आपण पुढचा विचार करू असंही अभिनेत्रीला दिग्दर्शकाकडून सांगण्यात आलं होतं.

  • 10/15

    चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल सांगताना तृप्ती म्हणते, “शूटिंग सुरू असताना संदीप सरांनी मला कोणतीही अडचण होणार नाही याची वेळोवेळी काळजी घेतली. याशिवाय रणबीर देखील दर ५ मिनिटांनी माझी चौकशी करत होता. मी अस्वस्थ होणार नाही याची काळजी घेत होता.”

  • 11/15

    “या सीनदरम्यान सेटवर फक्त ५ जण उपस्थित होते. त्यापेक्षा जास्त जण उपस्थित नसतील याची दक्षता सर्वांनी घेतली. आमच्या सेटवर फक्त दिग्दर्शक, डीओपी आणि कलाकारांशिवाय इतर कोणीही नव्हतं.” असं तृप्तीने सांगितलं.

  • 12/15

    तृप्ती पुढे म्हणाली, “सेटवर यायची कोणालाही परवानगी नव्हती, सगळे मॉनिटर्स बंद होते. याशिवाय शूट करताना तुला कधीही अस्वस्थ वाटलं, तर लगेच आम्हाला सांग आपण तुझ्या सोयीनुसार जाऊ असं मला सांगण्यात आलं होतं.”

  • 13/15

    “असे संवेदनशील सीन्स अशाप्रकारे शूट केले जातात याची कल्पना कोणालाही नसते.” असंही तृप्तीने सांगितलं.

  • 14/15

    दरम्यान, सध्या तृप्ती डिमरीने साकारलेल्या झोया या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

  • 15/15

    अभिनेत्रीने यापूर्वी ‘बुलबूल’, ‘काला’, ‘लैला मजनू’ अशा चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. परंतु, ‘अ‍ॅनिमल’मुळे तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. ( सर्व फोटो : तृप्ती डिमरी इन्स्टाग्राम )

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Actress triptii dimri reaction on intimate scene in animal movie with ranbir kapoor sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.