-
‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या वर्षभरापासून छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे.
-
रंजक कथानकामुळे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळवली.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेचं संपूर्ण कथानक सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज व मधूभाऊंच्या केसभोवती फिरतं.
-
‘ठरलं तर मग’ने टीआरपीत अव्वल स्थान राखण्याचं संपूर्ण श्रेय या मालिकेच्या कलाकारांबरोबरच लेखिकेचंही आहे.
-
यामध्ये अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली प्रमुख भूमिकेत आहेत.
-
याशिवाय केतकी पालव, प्रियांका दिघे, प्रिया तेंडोलकर, सागर तळाशीकर, ज्योती चांदेकर या कलाकारांनी मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेचा प्रमुख आधारस्तंभ आहे याची अनोखी कथा.
-
मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. त्यामुळे ‘ठरलं तर मग’ची लेखिका आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
या मालिकेचं लेखन ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने केलं आहे.
-
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात एकूण सहा अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारल्याने यातील नेमकी कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.
-
परंतु, या सहा जणींमध्ये अभिनेत्री शिल्पा नवलकर या उत्तम लेखिका आहे.
-
गेल्या वर्षभरापासून शिल्पा नवलकर, सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या कथेचं अर्थात ‘ठरलं तर मग’चं लेखन करत आहेत.
-
याशिवाय त्यांनी मालिकेत प्रतिमा ही महत्त्वपूर्ण भूमिका देखील साकारली आहे.
-
सायली-अर्जुनप्रमाणे प्रेक्षकांना प्रतिमा सुद्धा प्रचंड आवडते.
-
दरम्यान, शिल्पा नवलकर यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांचं लेखन केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी )
‘ठरलं तर मग’ची लेखिका आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री! मालिकेत साकारतेय विशेष भूमिका, जाणून घ्या कोण आहे ती?
‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्री आहे ‘ठरलं तर मग’ मालिकेची लेखिका, पाहा फोटो…
Web Title: Tharala tar mag marathi serial writter is baipan bhari deva actress shilpa navalkar sva 00