• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress shruti marathe told about her trolling for bikini shot in south movie scj

“लोक तेव्हा मला ‘राधा ही ब्रावरी’ म्हणायचे आणि…”, श्रुती मराठेने सांगितला ‘तो’ अनुभव

जाणून घ्या एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत श्रुती मराठेने नेमकं काय सांगितलं आहे?

January 1, 2024 08:05 IST
Follow Us
  • Actress Shruti Marathe
    1/11

    अभिनेत्री श्रुती मराठेने आत्तापर्यंत विविध चित्रपट, मालिकांमध्ये आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. तसंच तिने दाक्षिणात्य सिनेमाही केला आहे. एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. (सर्व फोटो सौजन्य-श्रुती मराठे, इंस्टाग्राम पेज)

  • 2/11

    श्रुती मराठे इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय असते. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तिने ट्रोलिंगचा एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

  • 3/11

    श्रुती मराठेने विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. धर्मवीर या सिनेमातल्या तिच्या कामाचंही कौतुक झालं.

  • 4/11

    राधा ही बावरी ही मालिका सुपरहिट ठरली. त्यानंतर तिला एका ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. स्वतः श्रुतीनेच याविषयी इतक्या वर्षांनी खुलासा केला आहे.

  • 5/11

    आरपार नावाच्या एका युट्यूब चॅनलला श्रुतीने मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने २०१२ मध्ये जेव्हा तिची राधा ही बावरी मालिका हिट झाली तेव्हा कसं ट्रोल केलं गेलं हे सांगितलं आहे.

  • श्रुती या मुलाखतीत म्हणाली मला अजूनही आठवतंय, राधा ही बावरी आली त्याआधी मी काही तमिळ सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्यातला एक चित्रपट खूप गाजला होता. कारण मी त्यात बिकिनी घातली होती.
  • 6/11

    सध्या साऊथचे सिनेमे डब होतात आणि ते पाहिलेही जातात, ओटीटीचंही माध्यम होतं. मात्र १०-१५ वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्हती. असंही श्रुतीने सांगितलं.

  • 7/11

    मी बिकिनीचा सीन दिला याचं मला वाईट वाटत नाही. मात्र त्यावेळी मला ट्रोल करण्यात आलं. मला अजूनही आठवतंय राधा ही ब्रावरी वगैरेही लोक म्हणाले होते. श्रुती मराठे कोण हे गुगल केलं की बिकिनीवरचा फोटो यायचा. माझी गाजलेली मालिका होती आणि मला अशा पद्धतीने ट्रोल केलं.

  • 8/11

    राधा ही बावरी मालिकेवरुन मला राधा ही ब्रावरी असं मुद्दाम ट्रोल केलं जायचं असा अनुभव श्रुतीने या पोर्टलच्या मुलाखतीत सांगितला.

  • 9/11

    श्रुती म्हणाली तेव्हा मी नवी होते. कुठल्या गोष्टी करायच्या त्या कुठल्या पद्धतीने शूट केल्या जातात याचं भान नव्हतं. मात्र मी बिकीनीचा सीन केल्याचा मला पश्चात्ताप वगैरे नाही किंवा तो का केला असं वाटलं नाही.

  • 10/11

    श्रुती मराठे ही सध्याच्या घडीची एक आघाडीची मराठी अभिनेत्री आहे. तिने तिला ट्रोलिंगचा कसा अनुभव आला ते सांगितलं आहे. श्रुतीने आत्तापर्यंत तप्तपदी, शुभ लग्न सावधान, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, मुंबई-पुणे-मुंबई २ अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. गुरु शिश्यन या तमिळ सिनेमात श्रुतीने बिकीनी सीन दिले होते. त्यावरुनच तिला ट्रोल करण्यात आल्याचं तिने सांगितलं.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress shruti marathe told about her trolling for bikini shot in south movie scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.