-
आमिर खानची लाडकी लेक आयरा खान व नुपूर शिखरेचा शाही विवाहसोहळा उदयपूरमध्ये १० जानेवारीला पार पडला.
-
आयरा खान – नुपूर शिखरेने उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं.
-
दोघांच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
आयराने लग्नात पांढरा शुभ्र गाऊन आणि नुपूरने बेज रंगाचा फॉर्मल सूट परिधान केला होता.
-
आयराने आई रीना दत्ता आणि वडील आमिर खान यांच्यासह लग्नमंडपात एन्ट्री घेतली. दोघेही लाडक्या लेकीला एकत्र घेऊन आले.
-
नुपूर शिखरेने लग्नमंडपात आपल्या आईबरोबर डॅशिंग अंदाजात एन्ट्री घेतली.
-
आयरा-नुपूरच्या लग्नाचे फोटो पाहून नेटकरी प्रितम शिखरे यांच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत. आमिरच्या विहीणबाईंनी लग्नात साधी व सुंदर अशी पेस्टल रंगाची साडी नेसली होती.
-
आयरा-नुपूरचं लग्न झाल्यावर उपस्थितांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. तसेच लाडक्या लेकीला नववधूच्या रुपात पाहून आमिर काहीसा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
-
दरम्यान, आयरा-नुपूरच्या लग्नसोहळ्यातील फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यानंतर १३ जानेवारीला या दोघांनी बॉलीवूड सेलिब्रिटींसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : आयरा खान व etherealstudio.in इन्स्टाग्राम )
लेकीच्या लग्नात आमिर खान-रीना दत्ताने वेधलं लक्ष, तर विहीणबाईंचा साधा अंदाज, आयरा खान-नुपूर शिखरेच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?
आई-बाबांसह एन्ट्री, लिपलॉक किस अन्…; ‘असा’ पार पडला आयरा खान-नुपूर शिखरेचा विवाहसोहळा
Web Title: Ira khan nupur shikhare wedding at udaipur inside photos viral aamir khan reena dutta pritam shikhare grabs attention sva 00