• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. raj thackeray dhiraj deshmukh rinku rajguru atul kulkarni sunil barve this marathi celebrities attend aamir khan daughter wedding reception pps

Photo: राज ठाकरे ते धीरज देशमुख; आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शन पार्टीत राजकारण्यांसह ‘हे’ मराठी कलाकार होते हजर

आयरा खान-नुपूर शिखरेच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी झाली धुमधडाक्यात

Updated: January 15, 2024 12:46 IST
Follow Us
  • आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकली. ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर १० जानेवारीला आयरा-नुपूरने ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. (फोटो सौजन्य - नुपूर शिखरे इन्स्टाग्राम)
    1/15

    आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकली. ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर १० जानेवारीला आयरा-नुपूरने ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. (फोटो सौजन्य – नुपूर शिखरे इन्स्टाग्राम)

  • 2/15

    उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यानंतर १३ जानेवारीला आयरा-नुपूरच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

  • 3/15

    मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरच्या बॉलरूममध्ये आयरा खान-नुपूर शिखरेच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी झाली. (फोटो सौजन्य – नुपूर शिखरे इन्स्टाग्राम)

  • 4/15

    आयरा-नुपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत राजकीय नेतेमंडळीसह बॉलीवूड सेलिब्रिटी आणि मराठी कलाकार सहभागी झाले होते. (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

  • 5/15

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसेप्शन पार्टीला हजेरी लावून आयरा-नुपूरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. (फोटो सौजन्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इन्टाग्राम)

  • 6/15

    या पार्टीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये पाहायला मिळाल्या. (फोटो सौजन्य – विरल भयानी इन्स्टाग्राम)

  • 7/15

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरेंसह उपस्थित लावली होती. (फोटो सौजन्य – मानव मंगलानी इन्स्टाग्राम)

  • 8/15

    तसेच आदित्य ठाकरे यांनी आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजस ठाकरे यांच्याबरोबर हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य – विरल भयानी इन्स्टाग्राम)

  • 9/15

    शिवाय काँग्रेस आमदार धीरज देशमुख पत्नी दीपशिखा देशमुखसह रिसेप्शन पार्टीला उपस्थित होते. यावेळी दोघं खूप सुंदर दिसत होते. (फोटो सौजन्य – इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम)

  • 10/15

    महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणजे रितेश व जिनीलीया देशमुख देखील आमिर लेकीच्या रिप्सेशनमध्ये सहभागी झाले होते. (फोटो सौजन्य – विरल भयानी इन्स्टाग्राम)

  • 11/15

    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही आयरा-नुपूरला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला होता. (फोटो सौजन्य – इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम)

  • 12/15

    रिसेप्शनपार्टीला धकधक गर्ल माधुरी दीक्षित हटके अंदाजात दिसली. तिच्यासह पती श्रीराम नेने देखील हजर होते. (फोटो सौजन्य – विरल भयानी इन्स्टाग्राम)

  • 13/15

    अभिनेते सुनील बर्वे यांनी पत्नी आणि मुलांसह आयरा-नुपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य – सुनील बर्वे इन्स्टाग्राम)

  • 14/15

    सुनील बर्वे यांनी रिसेप्शन पार्टीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – सुनील बर्वे इन्स्टाग्राम)

  • 15/15

    याशिवाय महाराष्ट्राचे लाडके आर्ची-परश्या अर्थात रिंकू राजगुरू व आकाश ठोसर देखील आयरा-नुपूरला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. तसेच अतुल कुलकर्णी देखील पत्नी गितांजली कुलकर्णी यांच्याबरोबर पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य – रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम)

TOPICS
आमिर खानAamir KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsराज ठाकरेRaj Thackerayरितेश देशमुखRiteish Deshmukh

Web Title: Raj thackeray dhiraj deshmukh rinku rajguru atul kulkarni sunil barve this marathi celebrities attend aamir khan daughter wedding reception pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.