-
श्रद्धा कपूर ही या पिढीतील सर्वात सुंदर व ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. पडद्यावरच्या तिच्या अभिनयाशिवाय तिचं मधुर हास्य आणि व्यक्तिमत्त्व यावर असंख्य तरुण जीव ओवाळून टाकतात.
-
चित्रपटांबरोबरच श्रद्धा सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकतीच सोशल मीडियावर तिने एक पोस्ट केली आहे ज्याच्या कॅप्शनमुळे वेगळ्याच चर्चेला वळण मिळालं आहे.
-
सध्या बॉलिवूडमध्ये बरेच सेलिब्रिटीज हे लग्नबंधनात अडकत आहेत अन् अशातच आता श्रद्धा कपूरचंही नाव पुढे आलं आहे. आपल्या नव्या इंस्टाग्राम पोस्टमुळे श्रद्धा चर्चेत आली आहे.
-
या फोटोमध्ये श्रद्धाने पांढऱ्या रंगाचा एक सुंदरसा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. या अत्यंत साध्या लूकमध्ये श्रद्धा फारच गोड दिसत आहे.
-
बरोबरच तिने अगदीच कमी मेक-अप केल्याने या फोटोमध्ये तिचं खरं सौन्दर्य खुलून दिसत आहे.
-
श्रद्धाचा हा लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे. सोशल मीडियावर श्रद्धाच्या या सिंपल पण अत्यंत सुंदर अशा या फोटोंची चर्चा आहे.
-
याबरोबरच श्रद्धाने या पोस्टमध्ये दिलेल्या कॅप्शनची जोरदार चर्चा आहे. श्रद्धाने हे फोटो शेअर करताना लिहिलं, “मी चांगली दिसतीये ना, मग लग्न करू का?”
-
यामुळे चाहत्यांनी तिच्या फोटोवर कॉमेंट करत तिच्या लग्नाबद्दल चर्चा करायला सुरुवात केली आहे.
-
काही चाहत्यांनी तर माझ्याशी लग्न कर असंही कॉमेंटमध्ये लिहिलं आहे.
-
श्रद्धाच्या या पोस्टमुळे तिच्या लग्नाची चर्चा होऊ लागली आहे. लवकरच ती लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे.
-
मीडिया रीपोर्टनुसार श्रद्धा ‘तू झुठी मै मक्कार ‘चा लेखक राहुल मोदीसह रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे.
-
अद्याप श्रद्धाने याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही, पण आता तिच्या या नव्या पोस्टमुळे पुन्हा त्यांच्या नात्याभोवती चर्चा रंगताना दिसत आहे. (फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर / इंस्टाग्राम अकाऊंट)
श्रद्धा कपूर अडकणार लग्नबंधनात? ‘या’ लेखकाबरोबर अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा
सध्या बॉलिवूडमध्ये बरेच सेलिब्रिटीज हे लग्नबंधनात अडकत आहेत अन् अशातच आता श्रद्धा कपूरचंही नाव पुढे आलं आहे
Web Title: Shraddha kapoor recent instagram post viral actress gives hint about her wedding avn