-
बॉलीवूडमधील कपल अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या विवाहसोहळ्यामुळे चर्चेत आहेत.
-
२१ फेब्रुवारी रोजी गोव्यातील आयटीसी ग्रुपच्या फाइव्ह स्टार रिसॉर्टमध्ये या दोघांचे लग्न झाले.
-
लग्नाच्या पोशाखासाठी रकुल आणि जॅकीने मनीष मल्होत्रा, सब्यसाची यापैकी कुणाचीही निवड न करता, तरुण तहिलियानी या डिझायनरची निवड केली.
-
रकुलने निळसर गुलाबी रंगाच्या शेड्स असलेला लेहेंगा परिधान केला होता तर जॅकीने गोल्डन शेरवानी आणि जड कुंदनच्या हाराची निवड केली होती.
-
पुन्हा एकदा रकुलने तिच्या सोशल मीडियावर लग्नाचे नवीन फोटोज शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये एक विशेष गोष्ट आहे.
-
रकुल प्रीत सिंगच्या हातातील मॅचिंग चुड्यातील कलीरे सध्या लक्ष वेधून घेत आहेत. गुलाबी रंगांच्या ब्रायडल चुड्याच्या कलीऱ्यात आर लेटरची डिझाइन दिसत आहे.
-
जॅकी भगनानी रकुलकडे प्रेमाने पाहत रोमॅंटीक पोज देताना दिसत आहे.
-
सुर्यास्ताच्या वेळी दोघे एकमेकांचा हात हातात घेतानाचा सुंदर फोटोही रकुलने शेअर केला आहे.
-
शेवटी सहकुटुंबाचा फोटो शेअर करत रकुलने कॅप्शन लिहिले, “आम्ही नेहमी एका फेरिटेल लग्नाचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरले त्यासाठी तरुण तहिलियानी यांना धन्यवाद. तुम्ही आमच्या पोशाखांतून आमची व्यक्तिरेखा खूप सुंदरपणे टिपली आहे. तुमच्या आणि आणि तुमच्या टीमच्या मेहनतीसाठी खूप खूप प्रेम.” (All Photos- rakulpreet
/Instagram)
PHOTOS: रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीचे नवीन फोटोज व्हायरल; रकुलच्या चुड्याने वेधलं लक्ष
रकुल प्रीत सिंगच्या हातातील मॅचिंग चुड्यातील कलीरे सध्या लक्ष वेधून घेत आहेत.
Web Title: Rakul preet singh jackky bhagnani wedding rakul shared new romantic photos of wedding and chudas dvr