-
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
-
अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील श्रद्धा कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : जनसत्ता)
-
या व्हायरल व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूर तिच्या कथित बॉयफ्रेंडबरोबर एकत्र दिसत आहे. (फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
-
गेल्या काही महिन्यांपासून श्रद्धा कपूर राहुल मोदीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. (फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
-
श्रद्धा आणि राहुल मोदीने जामनगरमध्ये अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला एकत्र उपस्थिती लावली होती. (फोटो सौजन्य : जनसत्ता)
-
राहुल मोदीचं बॉलीवूडशी खास कनेक्शन आहे. (फोटो सौजन्य : जनसत्ता)
-
IMDb नुसार, राहुल मोदी ‘प्यार का पंचनामा २’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘तू झुठी में मक्कार’ या चित्रपटांचा लेखक आहे. तसेच तो सहायक दिग्दर्शक म्हणून देखील काम करतो. (फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
-
राहुलने व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलं आहे. (फोटो सौजन्य : विरल भय्यानी पापाराझी इन्स्टाग्राम पेज)
-
२०११ मध्ये लव रंजनच्या ‘प्यार का पंचनामा’च्या सेटवर त्याने इंटर्न म्हणून काम केलं होतं. (फोटो सौजन्य : जनसत्ता)
-
राहुल मोदीचे वडील आमोद हे व्यावसायिक आहेत. (फोटो सौजन्य : जनसत्ता)
-
जामनगरमध्ये श्रद्धाने राहुल मोदीची ओळख आदित्य रॉय कपूरशी करून दिल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
-
प्री-वेडिंग कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रद्धा आणि राहुल मोदी पहिल्यांदाच माध्यमांसमोर एकत्र दिसले. (फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
-
परंतु, या दोघांकडून रिलेशनशिपच्या चर्चांबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. (फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
-
श्रद्धाने आजवर कधीच वैयक्तिक आयुष्याबाबत उघडपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. (फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, अभिनेत्री लवकरच ‘स्त्री २’ चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. (फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी आहे तरी कोण? बॉलीवूडशी आहे खास कनेक्शन, जाणून घ्या…
श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी करतो ‘हे’ काम, जामनगरमध्ये पहिल्यांदाच दिसले एकत्र
Web Title: Shraddha kapoor spotted with rumored boyfriend in anant ambani pre wedding function who is rahul mody know in details sva 00