• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. womens day 2024 dahad to arya these ott films series on womens jshd import asc

Women’s Day 2024 : ‘दहाड’ ते ‘महाराणी’, नारी शक्तीचा जयजयकार करणारे OTT वरील हे ७ चित्रपट-सिरीज पाहाच!

Women’s Day 2024 : बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनवले आहेत ज्यात मोठ्या पडद्यावर नारी शक्तीचं दर्शन घडवण्यात आलं आहं. तुम्ही हे चित्रपट OTT वर पाहू शकता.

Updated: March 8, 2024 17:39 IST
Follow Us
  • Happy Women's Day 2024
    1/8

    दर वर्षी ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत. बॉलीवूडमध्येही अनेक चित्रपट बनले आहेत ज्यात मोठ्या पडद्यावर नारी शक्तीचं दर्शन घडवण्यात आलं आहं. तुम्ही हे चित्रपट OTT वर पाहू शकता. (PC : Sonakshi Sinha/FB)

  • 2/8

    दहाड
    या सिरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या सिरीजमधील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. महिला दिनानिमित्त ही सिरीज तुम्ही अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (PC : Sonakshi Sinha/FB)

  • 3/8

    महाराणी
    बिहारच्या राजकीय पार्श्वभूमीवर आधारित ‘महाराणी’ या वेबसिरीजचा तिसरा सीझन सोनी लिव्हवर ७ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. यामध्ये हुमा कुरेशी एका राजकारणी महिलेच्या भूमिकेत आहे. (PC : Sonyliv)

  • 4/8

    माई
    या वेब सीरिजमध्ये एका मध्यमवर्गीय आईची व्यक्तिरेखा दाखवण्यात आली आहे, जी आपल्या मुलीच्या खुन्यांना शोधण्यासाठी शक्तिशाली लोकांचा सामना करते. साक्षी तन्वरने यामध्ये आईची भूमिका साकारली आहे, जिच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली. तुम्ही ही सिरीज Netflix वर पाहू शकता. (PC : Netflix)

  • 5/8

    पिंक
    अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूचा हा चित्रपट समाजाला अनेक संदेश देतो. समाज कितीही पुढारलेला झाला तरी आजही या समाजात काही लोक असे आहेत जे कपड्याच्या आधारावर मुलींच्या चारित्र्याबद्दल मत बनवतात. त्यातूनच महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतात. हा चित्रपट अशा अनेक विषयांना हात घालतो. तुम्ही हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता. (PC : Hotstar)

  • 6/8

    थप्पड
    तापसी पन्नू स्टारर चित्रपट ‘थप्पड’ हा पुरुषप्रधान विचारांच्या समाजाला आरसा दाखवणारा आहे. जे पुरुष महिलांवर हात उचलतात किंवा घरगुती हिंसाचाराला क्षुल्लक मानतात, त्यांना या चित्रपटातून चपराक लगावण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (PC : Prime Video

  • 7/8

    छपाक
    हा चित्रपट ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोनने लक्ष्मीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. (PC : Hotstar)

  • 8/8

    नीरजा
    हा चित्रपट एअर होस्टेस नीरजा भानोतच्या जीवनावर आधारित आहे, जिने 1986 मध्ये अपहरण झालेल्या PAMM फ्लाइट 73 मधील ३५९ लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या चित्रपटात सोनम कपूरने नीरजाची भूमिका साकारली आहे आणि हा चित्रपट तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता. (PC : Hotstar)

TOPICS
बॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Womens day 2024 dahad to arya these ott films series on womens jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.