Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sardar vallabhbhai patel was not given the post of prime minister because he did not know english kvg

Photo: ‘इंग्रजी येत नाही म्हणून वल्लभभाई पटेलांना…’, कंगनाचं विधान वादात

भाजपाची हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभेची उमेदवार आणि अभिनेत्री कंगना राणौतने सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबत केलेलं विधान वादग्रस्त ठरण्याची चिन्ह आहेत. तसेच हिंदूंना २०१४ रोजी स्वातंत्र्य मिळालं, असेही ती म्हणाली. (सर्व फोटो – कंगना राणौत इन्स्टाग्राम)

Updated: March 28, 2024 22:28 IST
Follow Us
  • Kangana Ranaut Lok Sabha Election 2024
    1/11

    बॉलिवूडची अभिनेत्री कंगणा रणौतला भाजपाने हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

  • 2/11

    ‘भारताला २०१४ साली स्वातंत्र्य मिळाले’, असे विधान काही काळापूर्वी कंगणा रणौतनं केलं होतं. त्या विधानावरून तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा कंगणाने याच विधानावर भाष्य केलं आहे.

  • 3/11

    टाइम्स नाऊ समिट २०२४ मध्ये बोलताना कंगणा रणौत म्हणाली, “होय, २०१४ रोजीच भारताला स्वातंत्र्य मिळालं.” या विधानावरून जे लोक ट्रोल करतात, त्यांनी समोर येऊन चर्चा करावी, असंही आवाहन कंगनानं केलं.

  • 4/11

    टाइम्स नाऊ समिटमध्ये बोलताना कंगना रणौत म्हणाली, “शरीराने स्वतंत्र होण्यालाच आपण स्वातंत्र्य मानतो का? तसे मानले तर आपण पारतंत्र्यात कधीच नव्हतो. कारण इंग्रजांनी आपल्याला तुरुंगात डांबलं नव्हतं. ते तर भारताला आपली वसाहत असल्याचे सांगत होते.

  • 5/11

    “आपल्या देशात त्यांचे कायदे होते. तर आपण विचाराने पारतंत्र्यात होतो. आपल्याला स्वतःचे लोक निवडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. १९४७ नंतर देशात विदेशी मानसिकतेच्या लोकाचं शासन होतं. आपली धोरणे विदेशातून ठरत होती. आपल्याला धर्माचे आचरण करता येत नव्हते. हिंदू असणे ही शरमेची बाब वाटत होती”, असंही कंगना म्हणाली.

  • 6/11

    जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे होते? त्यांना कुणी गायब केलं? ज्या व्यक्तीने स्वतःचे रक्त सांडून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याचं विमान भारतात उतरू दिलं नाही. उलट जे लोक तुरुंगात बसून टीव्ही पाहत होते, ते नंतर या देशाचे सरकार चालवू लागले.

  • 7/11

    स्वातंत्र्यानंतर ज्यांच्या हातात सत्ता गेली, ते ब्रिटिशांचेच पुढचे वारसदार होते, हे मी पुराव्यासह सिद्ध करू शकते, असेही आव्हान कंगना रणौतने दिलं.

  • 8/11

    १९४७ नंतर आपल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना बेपत्ता केलं गेलं. आझाद हिंद सेनेचे लोक उपाशी मारले. त्यांच्यावर अनेक खटले दाखल केले गेले. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यावरून दिसतं की, आपल्याला स्वातंत्र्य २०१४ रोजी मिळालं.

  • 9/11

    तसंच सरदार वल्लभभाई पटेल यांना इंग्रजी येत नव्हतं म्हणून पंतप्रधान केलं गेलं नाही, असाही दावा कंगना रणौतने यावेळी केला.

  • 10/11

    २०१४ नंतर आपल्याला हिंदू म्हणून अभिमानानं जगता येत आहे, आपल्या विचारधारेला सन्मान मिळत आहे, असंही कंगना या मुलाखतीमध्ये म्हणाली.

  • 11/11

    कंगना रणौतला हिमाचलच्या मंडी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी केलेलं एक विधान वादग्रस्त ठरलं. ज्यामुळं कंगना रणौतच्या मंडी मतदारसंघाची संपूर्ण भारताला ओळख झाली.

TOPICS
कंगना रणौतKangana Ranautकाँग्रेसCongressपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiभारतीय जनता पार्टीBJPलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Sardar vallabhbhai patel was not given the post of prime minister because he did not know english kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.