• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. how actress hema malini got dream girl name do you know the story behind this nick name scj

हेमा मालिनी यांना ‘ड्रीम गर्ल’ का म्हटलं जातं? काय आहे त्यामागचा किस्सा?

हेमा मालिनी यांना ड्रीम गर्ल म्हटलं जातं यामागे काय कारण आहे माहीत आहे का?

April 2, 2024 07:25 IST
Follow Us
    Hema Malini
    अभिनेत्री हेमा मालिनी या त्यांच्या काळातल्या सुपरस्टार अभिनेत्री आहेत. त्यांनी केलेल्या सिनेमांची आणि त्यांच्या भूमिकांची चर्चा कायमच होत असते. (सर्व फोटो सौजन्य-हेमा मालिनी इंस्टाग्रा आणि dreamgirl_hema Insta Page)
  • 1/11

    सपनो का सौदागर हा हेमा मालिनी यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात राज कपूर नायक होते.

  • 2/11

    हेमा मालिनी यांनी संजीव कुमार, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन या त्याकाळातल्या सुपरस्टार्स बरोबर कामं केली.

  • 3/11

    सिनेमांत काम करताना त्यांचे सूर जुळले ते धर्मेंद्र यांच्यासह. जितेंद्र आणि संजीव कुमार यांच्याशी त्यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी विवाह केला. रिल लाइफचे पार्टनर रिअल लाईफचे पार्टनरही झाले. तसंच हेमा मालिनी यांना एक टोपण नाव पडलं ते होतं ड्रीम गर्ल

  • 4/11

    अनेकांना असं वाटतं की ड्रीम गर्ल या सिनेमामुळे आणि त्यातल्या किसी शायर की गझल ड्रीम गर्ल या गाण्यामुळे त्यांना ड्रीम गर्ल हे टोपण नाव पडलं. पण खरा किस्सा वेगळाच आहे.

  • 5/11

    सपनो का सौदागर हा सिनेमा आला तेव्हा सिनेमाचे निर्माते बी अनंतस्वामी आणि इतर मेकर्स प्रसिद्धीसाठी एक वन लायनर शोधत होते.

  • बराच विचार केल्यानंतर बी. अनंतस्वामी यांनी सपनो के सौदागरच्या हेमामालिनीच्या पोस्टरखाली लिहिलं ‘राज कपूर की ड्रीम गर्ल’ हा त्या काळातला पब्लिसिटी स्टंट होता.
  • 6/11

    Raj Kapoor’s Dream Girl 45 year old Raj Kapoor with 20 year old Hema Malini अशी एक टॅगलाईन देऊनच अनंतस्वामी यांनी सिनेमाची पोस्टर्स रंगवली आणि ती प्रसिद्ध झाली.

  • 7/11

    सिनेमा या टॅगलाईनमुळे खूप जास्त चालला वगैरे असं मुळीच झालं नाही. पण हेमा मालिनी यांना ड्रीम गर्ल हे नाव मिळालं ते पहिल्या चित्रपटापासूनच.

  • 8/11

    सपनो का सौदागरनंतर खासगीत अनेक जण हेमा मालिनी यांचा उल्लेख ड्रीम गर्ल करायचे. पण ड्रीम गर्ल सिनेमा आल्यावर आणि ड्रीम गर्ल हे त्यातलं टायटल साँग आल्यावर सगळ्या जगाला त्यांची ड्रीम गर्ल वाटल्या त्या हेमा मालिनीच.

  • 9/11

    हेमा मालिनी यांचं सौंदर्य, त्यांच्या नाजूक अदा, सहज सुंदर अभिनय हे सगळं त्यांना ड्रीम गर्ल ठरवण्यास पुरेसं ठरलं. तर असा आहे या खास टोपण नावामागचा किस्सा.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहेमा मालिनीHema Malini

Web Title: How actress hema malini got dream girl name do you know the story behind this nick name scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.