• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor chinmay mandlekar son name jahangir meaning pps

Photos: चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या ‘जहांगीर’ नावाचा नेमका अर्थ काय? का ठेवलं असं नाव? जाणून घ्या…

चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने सांगितला मुलाच्या नावाचा अर्थ अन् त्यामागची गोष्ट…

Updated: April 23, 2024 13:22 IST
Follow Us
  • सध्या चिन्मय मांडलेकर हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. याच कारण त्याच्या मुलाचं नाव.
    1/12

    सध्या चिन्मय मांडलेकर हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. याच कारण त्याच्या मुलाचं नाव.

  • 2/12

    चिन्मयने लेकाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे सध्या त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतं आहे. पण हे पहिल्यांदाच घडलेलं नाही.

  • 3/12

    याआधी चिन्मयला मुलाच्या ‘जहांगीर’ नावावरून ट्रोल करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस अभिनेत्याने नाव ठेवण्यामागचा हेतू स्पष्ट केला होता.

  • 4/12

    पण तरीही अलीकडेच चिन्मयने एका पॉडकास्टला मुलाखत दिल्यानंतर त्याला मुलाच्या ‘जहांगीर’ नावावरून खूप ट्रोल करण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्याच्यासह कुटुंबाला देखील ट्रोल केलं गेलं.

  • 5/12

    ट्रोलिंगनंतर चिन्मयची पत्नी नेहा जोशी-मांडलेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून नेहाने ‘जहांगीर’ नावाच्या अर्थासह मुलाचं नाव का ठेवलं? याची माहिती दिली.

  • 6/12

    नेहा म्हणाली, “माझ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ आहे. ‘जहांगीर’ हे पर्शियन नाव आहे. माझ्या मुलाचा जन्म २१ मार्च २०१३ला झाला होता.”

  • 7/12

    “२१ मार्चला जमशेदी नवरोज असतो. त्या जमशेदी नवरोज दिवशी त्याचं नाव ‘जहांगीर’ (Jehangir) असं ठेवलं गेलं. नाव कोणावरून ठेवलं? कसं ठेवलं? तो मुद्दा नंतर येतो. मुळात या नावाचा अर्थ फार सुंदर आहे,” असं नेहा म्हणाली.

  • 8/12

    नेहा पुढे म्हणाली,”‘जहांगीर’ म्हणजे जगज्जेता. जग जिंकलेला ‘जहांगीर’. तर मला माहित नाही इतर माणसं आपल्या मुलाची नावं कशी ठेवतात. मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नाव त्या नावाचा अर्थ फार गोड आहे, म्हणून ठेवली आहेत.”

  • 9/12

    “शिवाय भारतरत्न जेआरडी टाटा यांचं नावही ‘जहांगीर’ आहे. टाटा कुटुंब माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेरणादायी कुटुंब संस्था आहे. त्यामुळे ‘जहांगीर’ या नावाचा अर्थ आवडला”, असं स्पष्ट नेहा जोशी-मांडलेकरने सांगितलं.

  • 10/12

    नेहाच्या या व्हिडीओनंतर चिन्मयने त्याच्या दुसऱ्यादिवशी मोठा निर्णय घेतला.

  • 11/12

    “छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागत या भूमिकेची मी रजा घेतो” असं चिन्मयने जाहीर केलं.

  • 12/12

    चिन्मयच्या या निर्णयावर अनेक कलाकारांमंडळींसह चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. (सर्व फोटो सौजन्य- चिन्मय मांडलेकर इन्स्टाग्राम आणि नेहा जोशी-मांडलेकर इन्स्टाग्राम)

TOPICS
चिन्मय मांडलेकरChinmay MandlekarमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actor chinmay mandlekar son name jahangir meaning pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.