-
‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे अभिनेता अमित भानुशाली सध्या घराघरांत लोकप्रिय झाला आहे.
-
या मालिकेत अमितने अर्जुन हे पात्र साकारलं आहे.
-
प्रेक्षकांचा लाडका अर्जुन नुकताच एका नव्या रुपात चाहत्यांसमोर आला आहे.
-
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने यासंदर्भात माहिती दिली.
-
‘स्टार प्रवाह’च्या ‘मी होणार सुपरस्टार – जोडी नंबर १’ या कार्यक्रमात अमितने सूत्रसंचालकाची जबाबदारी सांभाळली.
-
‘मी होणार सुपरस्टार – जोडी नंबर १’ या कार्यक्रमात अमित भानुशाली समृद्धी केळकरच्या साथीने सूत्रसंचालन करताना दिसला.
-
याचे खास व्हिडीओ आणि फोटो अमितने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसेच हा अनुभव खूपच छान असल्याचं अभिनेत्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
-
अमितच्या काही चाहत्यांनी त्याचं मेसेज करून कौतुक केलं आहे.
-
दरम्यान, ‘मी होणार सुपरस्टार – जोडी नंबर १’ हा कार्यक्रम दर शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित केला जातो. ( सर्व फोटो सौजन्य : अमित भानुशाली इन्स्टाग्राम )
‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन प्रेक्षकांसमोर झळकला नव्या रुपात; चाहत्यांनी केलं कौतुक, जाणून घ्या…
‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने सांभाळली नवीन जबाबदारी, फोटो व्हायरल
Web Title: Tharala tar mag fame amit bhanushali did anchoring in mi honar superstar jodi number 1 shared photos sva 00