• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amey narkar girlfriend isha sanjay play role in lakhat ek amcha dada marathi serial pps

Photos: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत झळकणार ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाची गर्लफ्रेंड, पाहा फोटो

ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाची गर्लफ्रेंड कोण आहे? जाणून घ्या…

June 29, 2024 08:53 IST
Follow Us
  • Amey Narkar Girlfriend Isha Sanjay Play Role In Lakhat Ek Amcha Dada marathi serial
    1/12

    ‘झी मराठी’ वाहिनीवर नितीश चव्हाणची प्रमुख भूमिका असलेली ‘लाखात एक आमचा दादा’ नवी मालिका ८ जुलैपासून सुरू होणार आहे. या मालिकेचे नवनवीन जबरदस्त प्रोमो पाहून प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे. याच मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकरांचा मुलाची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे.

  • 2/12

    ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा मुलगा अमेय नारकरला लहानपणापासून अभिनय व नृत्याची आवड आहे. रुईया महाविद्यालयातून त्यानं बीएमएममधून (संज्ञापन आणि माध्यम विभाग) शिक्षण घेतलं आहे. यावेळी त्यानं बऱ्याच एकांकिका, नाटकात काम केलं आहे.

  • गेल्यावर्षी त्यानं दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं. ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ या व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा अमेयनं सांभाळली होती.
  • 3/12

    आता अमेय नारकरच्या गर्लफ्रेंडची मराठी मालिकाविश्वात एन्ट्री होतं आहे.

  • अमेय नारकरच्या गर्लफ्रेंडचं नाव ईशा संजय असून दोघं एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.
  • 4/12

    काही महिन्यांपूर्वी अमेय व ईशाच्या एका डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या व्हिडीओत अमेयनं ईशाबरोबर ‘गोरी गौरी मांडवाखाली’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता.

  • 5/12

    आता अमेयची गर्लफ्रेंड ‘झी मराठी’च्या ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत झळकणार आहे.

  • 6/12

    या मालिकेतील सूर्यादादाच्या चार बहिणींपैकी एका बहिणीच्या भूमिकेत ईशा दिसणार आहे.

  • ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत ईशा राजश्री ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
  • 7/12

    ईशा संजयने ललित कला केंद्रातून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे.

  • 8/12

    शिवाय ती भरतनाट्यम देखील शिकली आहे. तिनं अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे व्हिडीओ अमेय व अविनाश नारकरांनी लाइक केलेले पाहायला मिळत आहेत.

  • तसंच ईशा व अमेयनं काही नाटकांमध्येही एकत्र काम केलं होतं. याचे व्हिडीओ देखील ईशाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिसत आहेत. (सर्व फोटो सौजन्य- अमेय नारकर फेसबुक, ईशा इन्स्टाग्राम आणि झी मराठी)
TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Amey narkar girlfriend isha sanjay play role in lakhat ek amcha dada marathi serial pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.