-
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या पाच दशकांहून अधिक काळातील चित्रपट कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आहेत. अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘शराबी’.
-
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विकीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट पिता-पुत्राच्या नात्याची गुंतागुंतीची एक गोष्ट आहे.
-
या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन त्यांचा डावा हात पॅन्टच्या खिशात ठेवायचे. चित्रपटातील त्यांची ही पद्धत चाहत्यांमध्ये स्टाइल म्हणून चांगलीच गाजली.
-
पण चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये असे काहीही नव्हते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिवाळीत फटाके फोडल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती.
-
या नंतरही त्यांनी चित्रपटाचे शूटिंग सुरूच ठेवली आणि चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते आपला हात खिशात लपवून ठेवायचे.
-
खरं तर, हा सल्ला त्यांना चित्रपटाच्या दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी दिला होता.
-
जेव्हा हा चित्रपट हिट झाला तेव्हा प्रेक्षकांना अमिताभ बच्चन यांची ही वेगळीच पद्धत खूप आवडली आणि पुढे ते एक स्टाईल स्टेटमेंट बनले. त्या काळात अनेक चाहत्यांनी ही स्टाइल फॉलो केली होती.
‘या’ चित्रपटाचं शूटिंग करताना दुखापतीमुळे अमिताभ बच्चन यांनी लपवला होता आपला हात, पण नंतर ती झाली एक वेगळीच स्टाइल…
भारतीय चित्रपटसृष्टीतील मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. यातील एक खास किस्सा त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा आहे.
Web Title: Amitabh bachchan had to hide his hand due to an injury while shooting for this film but later it became a different style among fans arg 02