-
‘मिर्झापूर’ या लोकप्रिय मालिकेचा बहुप्रतिक्षित तिसरा भाग ५ जुलै रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. तब्बल 4 वर्षांनंतर ही मालिका एका आकर्षक कथेसह परतत आहे. या मालिकेत पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल आणि विजय वर्मा हे मुख्य भूमिकेत आहेत.
-
‘कमांडर करण सक्सेना’ ही मालिका 8 जुलै रोजी डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ही ॲक्शन-पॅक मिस्ट्री थ्रिलर मालिका आहे. या मालिकेत अभिनेता गुरमीत चौधरी एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. तुम्ही वीकेंडला ही मालिका पाहू शकता.
-
लव रंजन दिग्दर्शित ‘वाइल्ड वाइल्ड पंजाब’ हा चित्रपट १० रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुण शर्मा, सनी सिंग आणि पत्रलेखा हे मुख्य भूमिकेत आहेत. प्रेक्षक या बहुप्रतीक्षित कॉमेडी चित्रपटासाठी वाट पाहत आहेत.
-
‘शोटाइम’ या मालिकेचा दुसरा सीझन १२ जुलै रोजी डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ही मालिका बॉलिवूडच्या ग्लॅमरस जीवनावर आधारित आहे.
-
‘पिल’ ही एक थ्रिलर वेबसिरीज आहे जी १२ जुलै रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होत आहे. या मालिकेतून रितेश देशमुखचे ओटीटीवर पदार्पण होणार आहे. या मालिकेत रितेश एका औषध कंपनीविरुद्ध लढा देणारा सरकारी वैद्यकीय अधिकारीची भूमिका सकरणार आहे.
-
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा ‘काकुडा’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम हे मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट झी ५ वर १२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
‘त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर’ ही कॉमेडी वेब सिरीज १८ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
वीकेंडला मनोरंजनाची धमाल, OTT वर बहुप्रतीक्षित चित्रपटांसह ‘या’ वेबसीरिज होणार प्रदर्शित; जाणून घ्या यादी
जाणून घ्या या वीकेंडला प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटांसह अनेक वेबसीरिजबद्दल.
Web Title: A weekend entertainment bonanza this webseries will release on ott along with much awaited filmsknow list arg 02