-
बिग बॉस ओटीटी या लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये अलीकडेच हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शोचा स्पर्धक अरमान मलिकने विशाल पांडेला कानाखाली मारली आहे.
-
खरंतर, काही दिवसांपूर्वीच विशालने अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिकवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. तो म्हणाला होता की त्याला कृतिका मलिक आवडते.
-
अलीकडेच, शोची माजी स्पर्धक आणि अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक ‘वीकेंड का वार एपिसोड’मध्ये दिसली.
-
तिने कार्यक्रमात आल्यावर विशाल पांडेच्या त्या टिप्पणीवर आक्षेप घेतला.
-
वादग्रस्त वक्तव्यानंतर अरमान मलिकने विशालला कानाखाली मारली आहे. या भांडणाची सुरुवात अरमान मलिक आणि विशाल यांच्या वादातून झाली, मात्र नंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले.
-
यानंतर अरमान मिलकला बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, कोण आहे विशाल पांडे? आणि त्याची संपत्ती किती?
-
विशाल पांडे एक अभिनेता आणि सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर आहे. इंस्टाग्रामवर विशालचे ९.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
विशाल पांडेला TikTok मधून लोकप्रियता मिळाली. यामध्ये तो समिक्षा सूद आणि भाविन भानुशाली यांच्यासह रील बनवत असे.
-
यानंतर या तिघांची ओळख सोशल मीडियावर ‘तीन तिगडा’ अशी झाली. विशालने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे.
-
विशाल पांडेने अनुराग कश्यप आणि आमिर खान यांच्यासह अनेक मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम केले आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विशाल पांडेची एकूण संपत्ती पाच ते दहा कोटी रुपये इतकी आहे.
-
त्याचबरोबर विशाल दर महिन्याला दहा ते वीस लाख रुपये कमावतो. त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे तीन कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. (All Photos: Vishal Pandey/Instagram)
अरमान मलिकने कानाखाली मारली तो विशाल पांडे नक्की आहे तरी कोण? दर महिन्याला कमावतो तब्बल ‘इतके’ पैसे
बिग बॉस ओटीटी या लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये अलीकडेच हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. शोचा स्पर्धक अरमान मलिकने विशाल पांडेला कानाखाली मारली आहे.
Web Title: Who is vishal pandey whom armaan malik slapped his monthly income and net worth jshd import pvp