-
अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा ‘सरफिरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. गेल्या २ वर्षात प्रदर्शित झालेले अक्षय कुमारचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत.
-
अभिनेत्याला दोन वर्षांत सुमारे ५०० कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन वर्षात अक्षयचा एकच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. जाणून घेऊया. गेल्या २ वर्षात प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटांची कमाई आणि बजेट.
-
अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांचा चित्रपट ‘सेल्फी’ गेल्या वर्षी २४ फेब्रुवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, जो फ्लॉप ठरला होता. या चित्रपटाचे बजेट सुमारे १०० कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ २३.६३ 23.63 कोटी रुपये कमावले. यामुळे निर्मात्यांना सुमारे ७६.३७ कोटी रुपयांचे नुकसान झाले. -
सत्य घटनेवर आधारित ‘मिशन राणीगंज’ हा चित्रपट ८ ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ५५ कोटी रुपयांमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ ४५. ६६ कोटी रुपये कमवू शकला. या चित्रपटाला जवळपास ५ कोटींचा तोटा झाला.
-
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा २०२४ मधील सर्वाधिक बजेट असेलेल्या चित्रपटांपैकी एक असून या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. चित्रपटाच्या कमाई बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने फक्त १०२ कोटी रुपये कमावले. निर्मात्यांना २४८ कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले. -
या महिन्यात १२ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला ‘सरफिरा’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटाचे बजेट ८० कोटी रुपये होते आणि कमाई फक्त २९.२४ कोटी रुपये झाली. हा चित्रपटही फ्लॉप ठरला म्हणून अभिनेत्याला जवळपास ५०० कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले. -
अक्षय कुमारच्या गेल्या दोन वर्षांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांपैकी फक्त एकच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओएमजी-२’ चित्रपटाचे बजेट सुमारे ६० कोटी रुपये होते आणि या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे २२१ कोटी रुपये होते.
दोन वर्षात तब्बल ५०० कोटींचे नुकसान, अक्षय कुमारचा हा’ एकमेव चित्रपट ठरला सुपरहिट; बॉक्स ऑफिसवर केली ‘एवढी’ कमाई
अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. मीडिया रेपोर्टसनुसार बॉक्स ऑफिसवर फ्लॉप चित्रपटांमुळे अक्षय कुमारला गेल्या २ वर्षात तब्बल ५०० कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
Web Title: 500 crore loss in two years akshay kumars only film became a superhit earned so much at the box office arg 02