• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. preity zinta lost her father at 13 become mother to 34 orphan girls know her net worth spl

वयाच्या १३ व्या वर्षी वडिलांचं छत्र हरवलं, आज ३४ मुलींचे संगोपन करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने नाकारली ६०० कोटींची संपत्ती

प्रिती झिंटाने वयाच्या १३ व्या वर्षी वडील गमावले. बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर तिने २००९ मध्ये ३४ अनाथ मुलींना दत्तक घेतले.

Updated: July 30, 2024 13:47 IST
Follow Us
  • Preity Zinta
    1/9

    बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेत आहोत, जिने एक-दोन नव्हे तर तब्बल ३४ मुलींना दत्तक घेतले आहे. खरं तर, आपण बोलतोय बॉलिवूडची डिंपल क्वीन प्रीती झिंटाबद्दल.

  • 2/9

    प्रीती झिंटा आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. प्रीतीने तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘कल हो ना हो’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘कोई मिल गया’, ‘सलाम नमस्ते’, ‘वीर जारा’ यासह अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून पडद्यापासून दूर आहे.

  • 3/9

    २०१६ मध्ये जीन गुडइनफशी लग्न केल्यानंतर, ती चित्रपटांमध्ये कमी दिसली. लग्नाच्या पाच वर्षानंतर ती सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली.

  • 4/9

    चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या प्रीती झिंटाने लहान वयातच वडिलांना गमावले हे फार कमी लोकांना माहीत असेल. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे जन्मलेल्या प्रीतीचे वडील भारतीय लष्करात अधिकारी होते.

  • 5/9

    प्रीती १३ वर्षांची असताना तिच्या वडिलांचा कार अपघातात मृत्यू झाला. या अपघातात तिची आई नीलप्रभा याही गंभीर जखमी झाल्या. दुखापतींमुळे नीलप्रभा यांच्यावर दोन वर्षे उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

  • 6/9

    या अपघाताचा प्रीतीच्या आयुष्यावरही खोलवर परिणाम झाला. ती लवकरच परिपक्व झाली. कदाचित याच कारणामुळे प्रीतीने अनाथ मुलींचे हाल समजून त्यांना दत्तक घेतले.

  • 7/9

    २००९ मध्ये, तिच्या ३४ व्या वाढदिवशी, प्रीतीने ऋषिकेशमधील मदर मिरॅकल अनाथाश्रमातील ३४ मुलींना दत्तक घेतले आणि त्यांच्या शिक्षण, अन्न आणि कपड्यांची सर्व आर्थिक मदत करण्याची जबाबदारी घेतली.

  • 8/9

    तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चित्रपट निर्माते कमाल अमरोही यांचा मोठा मुलगा शानदार अमरोही यांनी २०१० मध्ये जाहीर केले होते की ते प्रीती झिंटाला दत्तक घेऊ इच्छितात आणि त्यांची ६०० कोटी रुपयांची मालमत्ता तिच्या नावावर करणार आहेत. मात्र प्रीतीने ते घेण्यास नकार दिला होता.

  • 9/9


    प्रीती झिंटाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर १८३ कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली आहे. अभिनेत्री असण्यासोबतच प्रीती एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे. आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब या क्रिकेट संघाची सहमालक असण्यासोबतच प्रीती झिंटा एक निर्माती देखील आहे. याशिवाय ती ब्रँड एंडोर्समेंटही करते.
    (Photos Source: @realpz/instagram)

TOPICS
प्रीती झिंटाPreity ZintaमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Preity zinta lost her father at 13 become mother to 34 orphan girls know her net worth spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.