-
दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्यने अखेर सोभिता धुलिपालशी साखरपुडा केला आहे. (फोटो सौजन्य – नागार्जुन एक्स)
-
दोघांच्या साखरपुड्याचे फोटो नागाचे वडील सुपरस्टार नागार्जुनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – नागार्जुन एक्स)
-
समांथा रुथ प्रभूशी घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य व सोभिता एकमेकांना डेट करत असल्याचा चर्चा रंगल्या होत्या. पण दोघांनी याबाबत मौन पाळलं होतं. अखेर आज नागाचा त्याच्या हैदराबादमधील घरीच सोभिताबरोबर साखरपुडा पार पडला. (फोटो सौजन्य – नागार्जुन एक्स)
-
गेल्या वर्षी एका मुलाखतीमध्ये सोभिताने नागाची पहिली पत्नी समांथा रुथ प्रभूचं कौतुक केलं होतं. (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स)
-
‘बॉलिवूड बबल’ वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत रॅपिड फायर या खेळात सोभिताला समांथाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. (फोटो सौजन्य – सोभिता धुलीपाल)
-
‘समांथाच्या कोणत्या गोष्टीचं तुला कौतुक वाटतं’, असा प्रश्न विचारल्यावर सोभिता म्हणाली होती, “तिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. ज्या प्रकारे ती तिचं काम करते ते खूप भारी आहे.” (फोटो सौजन्य – सोभिता धुलीपाल)
-
“जसे की, तिचे चित्रपट पाहिल्यावर ती खूप चांगल्या प्रकारे या सगळ्या गोष्टी हाताळत आहे हे दिसत आहे. त्यामुळे मला ती खूप भारी वाटते,” असं सोभिता समांथाविषयी म्हणाली होती. (फोटो सौजन्य – सोभिता धुलीपाल)
-
‘मिस अर्थ’ झालेल्या सोभिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, २०१३ पासून करिअरची सुरुवात करणाऱ्या सोभिताने २०१६ मध्ये ‘रमन राघव २.०’ या थ्रिलर चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झालं होतं. (फोटो सौजन्य – सोभिता धुलीपाल)
-
त्यानंतर सोभिताची ‘द नाइट मॅनेजर’ वेब सीरिज गेल्या वर्षी ३० जूनला प्रदर्शित झाली होती. या सीरिजमध्ये अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूरबरोबर सोभिता पाहायला मिळाली होती. (फोटो सौजन्य – सोभिता धुलीपाल)
Photos: “ती खूप भारी..”, सोभिता धुलीपालाला नागा चैतन्यची पहिली बायको समांथाच्या ‘या’ गोष्टीचं वाटतं कौतुक
सोभिता धुलीपाल समांथा रुथ प्रभूविषयी नेमकं काय म्हणाली होती? वाचा…
Web Title: Naga chaitanya future wife sobhita dhulipala appreciate samantha ruth prabhu pps