-
‘बिग बॉस मराठी’मध्ये यंदा पहिल्यांदाच परदेसी गर्लने एन्ट्री घेतली. ही परदेसी गर्ल कोण असेल याबाबत शो सुरू होण्यापूर्वी सर्वत्र चर्चा रंगली होती.
-
अखेर परदेसी गर्ल इरिना रुडाकोवाने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ग्रँड एन्ट्री घेतली. ती नेमकं काय काम करते आणि कशी प्रसिद्धीझोतात आली याबद्दल जाणून घेऊयात…
-
इरिना ‘छोटी सरदारनी’ या हिंदी मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झाली.
-
या परदेसी पाहुणीला थोडंफार मराठी बोलता येतं. मात्र, बऱ्याच मराठी परंपरा व संस्कृती याची तिला माहिती आहे.
-
याशिवाय IPL मुळे देखील इरिना प्रसिद्धीझोतात आली.
-
IPL मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाची चीअरलीडर म्हणून देखील तिने काम केलं आहे.
-
तसेच इरिना योग प्रशिक्षक सुद्धा आहे.
-
‘बिग बॉस मराठी’मुळे तिचा चाहतावर्ग निश्चितच वाढला.
-
‘बिग बॉस’च्या घरात इरिनाने वैभवकडून मराठीचे धडे घेतले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : @ ira.rai9 इन्स्टाग्राम)
Bigg Boss Marathi : ‘परदेसी गर्ल’ इरिना रुडाकोवा आहे तरी कोण? ती काय काम करते? IPLशी आहे खास कनेक्शन
‘बिग बॉस मराठी’मधील इरिना रुडाकोवाबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का? जाणून घ्या…
Web Title: Bigg boss marathi who is irina rudakova foreign contestant and worked as a ipl cheerleader sva 00