• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. colors marathi serial sukh kalale antarpat abeer gulal will off air pps

Photos: ‘कलर्स मराठी’च्या एक नव्हे तर तीन मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कोणत्या ते जाणून घ्या…

पाच महिने देखील पूर्ण न होता ‘कलर्स मराठी’च्या ‘या’ मालिका गाशा गुंडाळणार…

August 25, 2024 13:52 IST
Follow Us
  • Colors Marathi Serial Sukh Kalale, antarpat, abeer gulal will off air
    1/9

    वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठीची चढाओढ कायम सुरू असते. त्यामुळे वाहिन्या वेगवेगळे प्रयोग करत असतात. सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर ‘स्टार प्रवाह’च्या मालिका आहेत. या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिना गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिका व कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)

  • 2/9

    ‘कलर्स मराठी’वर २६ ऑगस्टपासून ‘दुर्गा’ नावाची नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत अभिनेत्री रुमानी खरे आणि अभिनेता अंबर गणपुळे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. तर अभिनेत्री शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता प्रधान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणाऱ्या मुलीची कथा ‘दुर्गा’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.

  • 3/9

    २६ ऑगस्टपासून संध्याकाळी ७.३० वाजता ‘दुर्गा’ मालिकेतून एक नवी गोष्ट भेटीस येणार आहे. त्यामुळे सध्या ‘कलर्स मराठी’च्या या नव्या मालिकेची चर्चा सुरू आहे.

  • 4/9

    पण सध्या ७.३० वाजता प्रसारित होत असलेली ‘अंतरपाट’ मालिकेचं काय होणार? वेळ बदलणार की बंद होणार? असा महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ज्याचं उत्तर आता समोर आलं आहे.

  • 5/9

    खात्रीलायक सुत्रानुसार, ‘अंतरपाट’ मालिकेची वेळ बदलणार नाहीये. तर मालिका ( Antarpat Serial ) प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १० जूनपासून सुरू झालेली ही मालिका दोन महिन्यातच गाशा गुंडाळणार असल्याचं समजतं आहे. या मालिकेत नशीबाने बांधलेल्या गौतमी व क्षितिजच्या नात्याची गोष्ट पाहायला मिळत होती.

  • 6/9

    मात्र ‘अंतरपाट’ ही एकच मालिका ऑफ एअर होणार नसून आणखी दोन मालिका बंद होणार असल्याचं समोर आलं आहे.

  • 7/9

    ‘अंतरपाट’सह ‘सुख कळले’ मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी, सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका २२ एप्रिलपासून सुरू झाली होती. पण पाच महिन्यातच ‘सुख कळले’ मालिका देखील गाशा गुंडाळणार आहे.

  • 8/9

    तसंच बंद होणारी तिसरी मालिका म्हणजे ‘अबीर गुलाल’. अभिनेता अक्षय केळकर, गायत्री दातार आणि पायल जाधव यांची प्रमुख भूमिका असलेली मालिका २७ मेला सुरू झाली होती. पण ‘अबीर गुलाल’ ही मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांचा निरोप असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

  • 9/9

    सर्व फोटो सौजन्य – कलर्स मराठी

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Colors marathi serial sukh kalale antarpat abeer gulal will off air pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.