-
‘इंडियन आयडल’च्या पहिल्या पर्वाचा विजेता अभिजीत सावंत सध्या ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व गाजवतं आहे.
-
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात अभिजीत सावंतने खेळाडू वृत्तीने, त्याच्या स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच नेहमी नॉमिनेशमध्ये असणाऱ्या अभिजीतला प्रेक्षक भरभरून व्होट करून ‘बिग बॉस’मधून बाहेर जाण्यापासून वाचवताना दिसत आहेत.
-
अशातच अभिजीत सावंतने दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीचा सांगितलेला किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे. या भेटीत उद्धव ठाकरेंनी अभिजीतला त्यांचा एक मजेशीर किस्सा सांगितला होता. नेमकं काय घडलं होतं? वाचा…
-
अभिजीत सावंतने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीचा किस्सा सांगितला.
-
अभिजीत म्हणाला, “इंडियन आयडलचा विजेता झाल्यानंतर मी मातोश्रीवर गेलेलो. बाळासाहेब ठाकरेंनी मला घरी बोलावलेलं. त्यांना कलाकारांची खूप आवड आहे ना. त्यामुळे त्यांच्या घरातल्या वरच्या मजल्यावर आम्ही सगळे बसलो. त्यांनी मला उद्देश दिले. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याविषयी बोललो.”
-
पुढे अभिजीत म्हणाला, “तसंच त्यांनी पूर्ण कुटुंबाला बोलावलं होतं. संपूर्ण ठाकरे कुटुंब माझ्यासमोर उभं होतं. बाळासाहेबांनी माझी कुटुंबातील सदस्यांबरोबर ओळख करून दिली. माझ्याबरोबर आई-वडील होते.
-
“आम्ही ज्यांना मतदान करायचो, ज्यांना आम्ही तारणहार समजायचो, महाराष्ट्राचं चांगलं हेच करणार, असं म्हणायचो. तेच आपले आवडते नेते ते आम्हाला ओळख करून देतायत. हा बघा, हा हे आहे, अशी नाव घेऊन ते ओळख करून देत होते. तो एक वेगळाच अनुभव होता,” असं अभिजीत सावंतने सांगितलं.
-
पुढे अभिजीतने उद्धव ठाकरेंचा मजेशीर किस्सा सांगितला.
-
अभिजीत म्हणाला, “माननीय उद्धव ठाकरेंनी मला त्यांचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “आम्ही ना काय करायचो. आमची मिटिंग वगैरे चालू असायची आणि मिटिंगमध्ये आमची चर्चा असायची. तेव्हा मी तुझ्यासाठी खिशातला हळूच मोबाइल काढून तुला व्होट करायचो.”
-
पुढे अभिजीत म्हणाला, “असं काही नव्हतं की शिवसेनेने मला जिंकवण्यासाठी वाहिनीवर दबाव आणला होता वगैरे,”
-
“तसं मग सगळ्यांनीच दबाब टाकला असता. राहूलसाठी तर जास्त दबाव टाकायला पाहिजे होता. तो पण मराठीचं आहे. त्यात त्याच्याकडे आधी स्टार व्हॅल्यूव क्वॉलिटी होती,” असं अभिजीतने सांगितलं.
-
सर्व फोटो सौजन्य – अभिजीत सावंत इन्स्टाग्राम, कलर्स मराठी आणि ग्राफिक्स टीम
Photos: ‘इंडियन आयडल’ कार्यक्रमावेळी अभिजीत सावंतला व्होट करण्यासाठी उद्धव ठाकरे काय करायचे? वाचा…
मातोश्रीवरील भेटीच्या वेळी उद्धव ठाकरेंनी स्वतः अभिजीत सावंतला सांगितला ‘हा’ किस्सा
Web Title: Bigg boss marathi fame abhijeet sawant tells funny stroy of uddhav thackeray pps