-
बिग बॉसमध्ये स्पर्धक सहभागी झालेल्या कलाकारांची सतत चर्चा होताना दिसते. अनेकवेळा त्यांना ट्रोलदेखील केले जाते. (फोटो सौजन्य: कलर्स मराठी इन्स्टाग्राम)
-
आता अभिनेत्री सुरेखा कुडचींनी एका मुलाखतीदरम्यान बिग बॉस मराठी ५ व्या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या खेळावर वक्तव्य केले आहे.
-
बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या ज्या स्पर्धकांची प्रतिमा डागाळली जाते, त्यांना शोनंतर मिळणाऱ्या कामावर परिणाम होतो का, असा प्रश्नाचे सुरेखा कुडचींनी दिलेले उत्तर चर्चेत आहे.
-
त्यांनी म्हटले, “५० टक्के परिणाम होईल; ५० टक्के कदाचित नाही होणार. कारण- हल्ली असंही होतंय की, लोक असा विचार करतात की बिग बॉसमुळे या व्यक्तीचं एवढं नाव झालंय, तर आपल्या प्रोजेक्टमध्ये घेऊ.”
-
आम्ही किती वर्ष काम केलंय याच्यापेक्षा मालिकांमध्येदेखील नवीन कलाकारांना किंवा ज्यांचे सोशल मीडियावर फॉलोअर्स जास्त असतील त्यांना घेतात.
-
अशा लोकांना काम करता येतं का? ते डायलॉग पूर्ण लक्षात ठेवतो का? चुकत तर नाही ना? त्याला तांत्रिक ज्ञान किती आहे? या सगळ्यापेक्षा त्याचे फॉलोअर्स किती आहेत, हेच सध्या बघितलं जातं.
-
या व्यक्तींनी काम करू नये, असं माझं म्हणणं नाही; पण कलाकार म्हणून मला या गोष्टीचा त्रास होतो.
-
बऱ्याच वेळा प्रॉडक्शन हाऊसबरोबर बोलताना पेमेंटचे जेव्हा विषय निघतात; त्यावेळी मला वाटतं की, आता जे आहेत ते दोन आणि चार रुपयांमध्ये काम करायला तयार असतील, तर ज्यांना १० आणि १५ रुपये द्यायचे आहेत, ते महागच वाटतील.
-
सुरेखा कुडची बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्या होत्या.
-
बिग बॉस मराठी ५ व्या पर्वातील सदस्यांच्या खेळावर सुरेखा कुडची सोशल मीडियावर व्यक्त होतात. (फोटो सौजन्य: कलर्स मराठी इन्स्टाग्राम)
-
जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळेला एका भांडणात जोकर म्हटले होते. (फोटो सौजन्य: कलर्स मराठी इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर सुरेखा कुडचींनी संतप्त पोस्ट लिहिली होती. या पोस्टची मोठी चर्चा झाली होती.(सर्व फोटो सौजन्य: सुरेखा कुडची इन्स्टाग्राम)
“…पण कलाकार म्हणून मला या गोष्टीचा त्रास होतो”, सुरेखा कुडची असं का म्हणाल्या?
Surekha Kudachi: एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री सुरेखा कुडचींनी कलाकार म्हणून मला ‘त्या’ गोष्टीचा त्रास होतो, असे म्हटले आहे.
Web Title: Surekha kudachi shares i feel bad as a actor when people doing project because of they have more followers on social media nsp