-
९० च्या दशकातील सुपरस्टार गोविंदाचे नाव बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्समध्ये समाविष्ट आहे. त्याचे स्टारडम शिखरावर होते आणि तो तरुण मुलींच्या हृदयावर राज्य करत असे. अलीकडेच, गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने एक मनोरंजक आणि गंमतीशीर किस्सा शेअर केला आहे, जो गोविंदाच्या चाहत्यांच्या कहर वेडेपणा सिद्ध करतो.
-
सुनीता आहुजाने ‘टाइमआउट विथ अंकित’ पॉडकास्टमध्ये एका गंमतीशीर गोष्टीचा उलगडा केला आहे. एका मंत्र्याची मुलगी असलेली चाहती गोविंदाच्या घरी २० दिवस मदतनीस म्हणून कशी राहिली हे त्यांनी सांगितले.
-
सुनीता म्हणाल्या, “एकदा एक फॅन आमच्या घरी मदतनीस म्हणून आली होती. तिने जवळपास २०-२२ दिवस आमच्यासोबत वेळ घालवला आणि घरची सर्व कामे केली.”
-
सुनीता यांनी सांगितले की, “ती मुलगी आणि तिचे काम पाहून त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यांना असे लक्षात आले की ती घरातील मदतनीस म्हणून कोणतेही काम नीट करु शकत नाही आणि भांडीही छान धुवू शकत नाही.”
-
त्यांनी पुढे सांगितले, “ती गोविंदाची वाट पाहत उशिरापर्यंत जागीच राहायची. हे सर्व पाहून मला आश्चर्य वाटायचे.”
-
सुनीता पुढे म्हणाल्या, “मी माझ्या सासूबाईंना याबद्दल सांगितले आणि तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांची मदत घेतली. शेवटी आम्हाला कळले की ती एका मंत्र्याची मुलगी आहे आणि गोविंदाची फॅन आहे.”
-
सुनीता पुढे म्हणाल्या, “मी तिची पार्श्वभूमी तपासली. त्यानंतर तिने रडत आमच्याजवळ कबूली दिली की ती गोविंदाची फॅन आहे.”
-
“त्यानंतर तिचे वडील त्यांच्यासोबत चार गाड्या घेऊन आले आणि तिला घेऊन गेले. मला वाटते की तिने जवळपास २० दिवस आमच्यासोबत घालवले. अशी गोविंदाची फॅन फॉलोइंग आहे.”
(फोटो स्त्रोत: @officialsunitaahuja/instagram) -
(Photos Source: @officialsunitaahuja/instagram)
चक्क गोविंदाच्या घरात चाहतीनं २० दिवस मदतनीस म्हणून केलं काम, पत्नी सुनीता आहुजाने सांगितला गंमतीशीर किस्सा
Govinda’s Wife Sunita Ahuja: ९० च्या दशकातील सुपरस्टार गोविंदाचे नाव आजही चाहत्यांच्या हृदयात आहे. त्या काळात त्याचे स्टारडम आणि लोकप्रियता शिखरावर होती. अलीकडेच, गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी एक मनोरंजक आणि धक्कादायक किस्सा शेअर केला आहे, जो गोविंदाच्या फॅन फॉलोविंगचा वेडेपणा दाखवतो.
Web Title: Govinda female fan once lived at his house as maid for 20 days reveals wife sunita ahuja spl