-
टीव्ही मालिकांमध्ये दिसणाऱ्या अनेक अभिनेत्री आज यशस्वी व्यावसायिका आहेत आणि या अभिनेत्री व्यवसायातून मोठी कमाई देखील करतात.
-
जाणून घेऊया या यशस्वी अभिनेत्रींबद्दल ज्यांनी व्यावसायाच्या क्षेत्रातही नाव मोठं केलं आहे.
-
अनुपमा या टीव्ही मालिकेत ‘अनुपमा’ ही व्यक्तिरेखा साकारणारी रुपाली गांगुली तिच्या वडिलांसोबत एक ॲड एजन्सी चालवते.
-
4 टीव्ही अभिनेत्री सरगुन मेहता देखील व्यवसायातून भरपूर पैसे कमावते. अभिनेत्री आणि तिचा पती रवी दुबे यांचे ड्रीमियाता एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. या प्रॉडक्शन हाऊसमध्ये अनेक टीव्ही मालिका तयार झाल्या आहेत.
-
अभिनयाच्या जगाला अलविदा केल्यानंतर आशका गोराडियाने २०१९ मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ही अभिनेत्री कॉस्मेटिक आणि स्किनकेअर ब्रँड ‘रेनी कॉस्मेटिक्स’ची मालक आहे.
-
टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी मौनी रॉय एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे. अभिनेत्रीने गेल्या वर्षी मुंबईत ‘बदमाश’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केला आहे.
-
अभिनेत्रीचे अदिती शिरवाईकरचे मुंबई तसेच बेंगळुरूमध्ये अनेक रेस्टॉरंट आहेत जिथून ती चांगली कमाई करते.
-
अभिनेत्री रक्षंदा खानची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि प्रोडक्शन हाऊस देखील आहे.
Photos : छोट्या पडद्यावरील ‘या’ अभिनेत्री आहेत यशस्वी व्यावसायिका; जाहिरातीपासून ते कॉस्मेटिकपर्यंत मोठ्या उद्योग क्षेत्रात आहे सहभाग
यशस्वी टीव्ही अभिनेत्री व्यावसायिक महिला: अशा अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत ज्या व्यवसायातूनही भरपूर कमाई करतात. यामध्ये सरगुन मेहतापासून सिंपल कौलपर्यंतच्या नावांचा समावेश आहे.
Web Title: Photos these actresses on small screen are successful professionals it is involved in a wide range of industries from advertising to cosmetics arg 02