-
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ५० च्या दशकापासून चित्रपट जगतात राज्य करणाऱ्या ७४ वर्षीय मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या अभिनय आणि उत्कृष्ट कामासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
मिथुन चक्रवर्ती अभिनेता असण्यासोबतच एक यशस्वी बिझनेसमन देखील आहेत. त्यांची देशात अनेक हॉटेल्स आहेत जिथून ते करोडोंची कमाई करतात. चला जाणून घेऊ त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे? (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
राजकीय कारकीर्द
मिथुन चक्रवर्ती यांच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगायचे तर, त्यांनी २०१४ मध्ये भारतीय तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, २०१६ मध्ये त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. यानंतर, टीएमसीशी संबंध तोडून २०२१ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
कंपन्यांमध्ये गुंतवणूक
myneta.info वेबसाइटनुसार, मिथुन चक्रवर्ती आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर बँका, वित्तीय संस्था आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांमध्ये ३३ कोटी ३० लाख रुपये जमा आले आहेत. याशिवाय त्यांनी रोखे, डिबेंचर्स आणि शेअर्समध्ये ३ कोटी २५ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
निव्वळ संपत्ती
या वेबसाइटनुसार मिथुन चक्रवर्ती यांची एकूण संपत्ती १०१ कोटी रुपये आहे. मात्र, त्यांच्यावर सुमारे २ कोटी रुपयांची देणीही आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
कार कलेक्शन आणि ज्वेलरी
या वेबसाइटनुसार, मर्सिडीज, टोयोटा फॉर्च्युनर आणि फोर्ड एंडेव्हर व्यतिरिक्त, मिथुन चक्रवर्ती यांच्या घरात इतर अनेक गाड्या पार्क केल्या आहेत. या गाड्यांची किंमत अंदाजे १ कोटी ९३ लाख रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे १० लाख रुपयांचे दागिनेही आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
जमिनीची किंमत
मिथुन चक्रवर्ती यांनी प्रॉपर्टीमध्ये सर्वाधिक पैसा गुंतवला आहे. अभिनेता आणि त्याच्या पत्नीच्या नावावर तामिळनाडूमध्ये चार शेतजमिनी आहेत ज्यांची किंमत ९ कोटी १३ लाख रुपये आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
सर्वाधिक कमाई इथून येते
तामिळनाडूतच त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर अनेक व्यावसायिक इमारती आहेत ज्यातून त्यांना प्रचंड उत्पन्न मिळते. या वेबसाइटनुसार त्यांची सध्याची किंमत २३ कोटी ५७ लाख रुपये आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे किती घरे आहेत आणि त्यांची किंमत काय?
मिथुन चक्रवर्ती यांची ३ घरे आहेत, दोन मुंबईत आणि एक तामिळनाडूत. सध्या या तीन घरांची किंमत ५ कोटी ७९ लाख रुपये आहे. एकूणच, मिथुन चक्रवर्ती यांनी मालमत्तेची एकूण ३८ कोटी ५० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
हेही वाचा- Navratri 2024 : मुंबईमध्ये नवरात्रौत्सवाला दिमाखात सुरुवात, आदिशक्तीचे जल्लोषात आगमन,…
मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे मुंबई ते तामिळनाडूपर्यंत कोट्यवधी रुपयांची संपत्ती, सर्वाधिक कमाई कुठून होते?
Mithun Chakraborty to get Dadasaheb Phalke Award, Net Worth, Property, and Assets: मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे? आणि त्यांच्या कामईचे स्त्रोत के आहेत? याबद्दल जाणून घेऊया.
Web Title: Mithun chakraborty to get dadasaheb phalke award how much property does actor own spl