Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. why salim khan made threat rishi kapoor know the reason late actor wrote in autobiography khullam khulla nsp

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना सलीम खान यांनी का दिली होती धमकी?

Late actor Rishi Kapoor: सलीम खान यांनी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना का दिलेली धमकी? जाणून घ्या…

Updated: October 10, 2024 09:43 IST
Follow Us
  • Rishi Kapoor
    1/12

    दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या ऑटोबायोग्राफीमध्ये ‘त्रिशूल’ चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर सलीम खान यांच्याशी झालेल्या वादाबद्दल आठवण लिहिली आहे. (फोटो सौजन्य: ऋषी कपूर ऑफिशिअल फॅनपेज इन्स्टाग्राम)

  • 2/12

    ऋषी कपूर यांनी ‘खुल्लम खुल्ला’ या त्यांच्या जीवनचरित्रात लिहिले आहे, “मुंबईतील एका हॉटेलमध्ये मी स्नूकर खेळत होतो. ((फोटो सौजन्य: ऋषी कपूर ऑफिशिअल फॅनपेज इन्स्टाग्राम)

  • 3/12

    “त्यावेळी सलीम साहेब तिथे आले आणि मला म्हणाले, सलीम-जावेदला नाही म्हणायची तुझी हिम्मत कशी झाली? त्यावर मी त्यांना उत्तर दिले की मला ही भूमिका आवडली नाही(फोटो सौजन्य: ऋषी कपूर ऑफिशिअल फॅनपेज इन्स्टाग्राम)

  • 4/12

    “त्यावर सलीम खान यांनी अमिताभ बच्चन यांना लॉन्च केल्याबद्दल बढाया मारल्या आणि राजेश खन्नाने त्यांना एकदा नकार दिला होता आणि अमिताभ बच्चन इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर त्यांचे करिअर संपुष्टात आल्याचे सांगितले.” (फोटो सौजन्य: ऋषी कपूर ऑफिशिअल फॅनपेज इन्स्टाग्राम)

  • 5/12

    “प्रेक्षकांना अमिताभसारखा नायक चित्रपटात पाहिजे होता. सलीम साहेबांनी मला सांगितले, तुला माहीत आहे का? आजपर्यंत आम्हाला कोणीही नाही म्हणू शकले नाही. आम्ही तुझे करिअर संपवू शकतो.” (फोटो सौजन्य: ऋषी कपूर ऑफिशिअल फॅनपेज इन्स्टाग्राम)

  • 6/12

    पुढे ते लिहितात, “जेव्हा मी सलीम खानला विचारले की त्यांच्या मनात काय आहे, त्यांनी म्हटले, ‘तुझ्यासोबत कोण काम करेल?तुला माहिती आहे का, आम्ही राजेश खन्नाला जंजीर चित्रपट ऑफर केला होता आणि त्याने आम्हाला नकार दिला.”(फोटो सौजन्य: ऋषी कपूर ऑफिशिअल फॅनपेज इन्स्टाग्राम)

  • 7/12

    “आम्ही त्याला काही केले नाही पण आम्ही त्याला पर्याय निर्माण केला.” (फोटो सौजन्य: ऋषी कपूर ऑफिशिअल फॅनपेज इन्स्टाग्राम)

  • 8/12

    “अमिताभ बच्चनला राजेश खन्नाचा पर्याय म्हणून उभे केले आणि राजेश खन्नाचे करिअर संपले.(फोटो सौजन्य: सलीम खान फॅन्स इन्स्टाग्राम)

  • 9/12

    “आम्ही तुझ्याबरोबरदेखील अगदी तसेच करू”, असे सलीम खान यांनी म्हटल्याची आठवण ऋषी कपूर यांनी त्यांच्या जीवनचरित्रात लिहिली आहे. हा वाद पुढे वाढवला नसल्याचे ऋषी कपूर यांनी लिहिले आहे. (फोटो सौजन्य: सलीम खान फॅन्स इन्स्टाग्राम)

  • 10/12

    सलीम-जावेद या दोघांच्या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपटांच्या कथा लिहिल्या. पण काही कारणाने नंतर ही जोडी वेगळी झाली. (फोटो सौजन्य: सलीम खान फॅन्स इन्स्टाग्राम)

  • 11/12

    अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘जंजीर’ चित्रपटातून अँग्री यंग मॅन म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)

  • 12/12

    ऋषी कपूर यांनी १९७३ मध्ये ‘बॉबी’ चित्रपटात पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य: ऋषी कपूर ऑफिशिअल फॅनपेज इन्स्टाग्राम)

TOPICS
ऋषी कपूरRishi Kapoorजावेद अख्तरJaved AkhtarबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Why salim khan made threat rishi kapoor know the reason late actor wrote in autobiography khullam khulla nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.