-
Reeta Sanyal
अदा शर्माची क्राइम थ्रिलर वेब सिरीज ‘रीता सन्याल’ १४ ऑक्टोबरला हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
The Pradeeps of Pittsburgh
‘द प्रेरीज ऑफ पिट्सबर्ग’ ही एक इंग्रजी वेब सीरिज आहे, जी १७ ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून पिट्सबर्गमध्ये राहणाऱ्या एका भारतीय कुटुंबाची कथा यात आहे. (Still From Film) -
The Lincoln Lawyer
‘द लिंकन लॉयर’ १७ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर येणार आहे. (Still From Film) -
Outside
फिलिपिन्सची पहिली झोम्बी फीचर फिल्म ‘आउटसाइड’ १७ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. जर तुम्ही हॉरर चित्रपटांचे शौकीन असाल तर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. (Still From Film) -
Snakes and Ladders
डार्क ह्युमर आणि थ्रिलने परिपूर्ण असलेली ‘स्नेक्स अँड लॅडर्स’ ही वेबसिरीज १८ ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
Soul Stories
मल्याळम वेब सिरीज ‘सोल स्टोरीज’ १८ ऑक्टोबर रोजी मनोरमा मॅक्सवर प्रसारित होईल. (Still From Film) -
1000 Babies
नीना गुप्ता यांची नवीन थ्रिलर वेब सिरीज ‘१००० बेबीज’ १८ ऑक्टोबर रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
Fabulous Lives Vs Bollywood Wives
बॉलीवूड स्टार्सच्या पत्नींच्या जीवनावर आधारित ‘फॅब्युलस लाइव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाइव्हज’ ही वेबसिरीज १८ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर येणार आहे. ही सिरीज ग्लॅमर, नाटक आणि मनोरंजनाचे संपूर्ण पॅकेज असेल. (Still From Film)
‘१००० बेबीज’, बहूप्रतीक्षित झोंबी फिल्म ‘आउटसाइड’सह या आठवड्यात ‘हे’ चित्रपट आणि वेब सिरीज ओटीटीवर होणार दाखल!
Latest OTT Releases This Week: या आठवड्यात, प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा मोठा डोस मिळणार आहे. क्राईम थ्रिलरपासून हॉरर आणि कॉमेडीपर्यंत सर्व प्रकारच्या कंटेंटचा आनंद घेता येणार आहे . या आठवड्यात कोणत्या वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत ते जाणून घेऊ.
Web Title: 1000 babies to outside enjoy thriller web series and new zombie horror movies on ott this week spl