• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from atal bihari vajpayee to sanjay gandhi emergency actors will be seen in these historical characters spl

अटलबिहारी वाजपेयी ते संजय गांधी, ‘Emergency’ चित्रपटात ‘हे’ कलाकार ‘या’ ऐतिहासिक पात्रांमध्ये दिसणार!

Emergency Actors historical characters: कंगना रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटात अनेक ऐतिहासिक पात्रे दिसणार आहेत. चला जाणून घेऊया या चित्रपटात कोणते स्टार्स कोणती ऐतिहासिक भूमिका साकारत आहेत.

Updated: October 19, 2024 00:02 IST
Follow Us
  • Kangna Ranaut historical characters
    1/11

    बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कंगना रणौत त्यांच्या आगामी पॉलिटिकल-ड्रामा चित्रपट ‘इमर्जन्सी’मुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून बराच गदारोळ झाला होता. याआधी इमर्जन्सी ६ सप्टेंबरला रिलीज होणार होता, पण ‘शीख समुदायाच्या आक्षेपानंतर सिनेमाचं रिलीज थांबवण्यात आलं होतं. आता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दिला असून लवकरच तारखाही जाहीर केल्या जातील.(Photo: Kangana Ranaut/Insta)

  • 2/11

    इमर्जन्सी’ चित्रपटात अनेक स्टार्स ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहेत. कुणी माजी पंतप्रधान अटलबिहारींच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे तर कुणी संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. कोण कोणाची भूमिका साकारत आहे ते जाणून घेऊया. (Photo: Kangana Ranaut/Insta)

  • 3/11

    कंगना रणौत: अभिनेत्री इंदिरा गांधी, देशाच्या माजी पंतप्रधान आणि आणीबाणी लागू केलेल्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo: Kangana Ranaut/Insta)

  • 4/11

    अनुपम खेर: अनुपम खेर हे इंदिरा गांधींचे कट्टर विरोधक जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत. (Photo: Kangana Ranaut/Insta)

  • 5/11

    श्रेयस तळपदे : या चित्रपटात श्रेयस तळपदे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. (Shreyas Talpade/Insta)

  • 6/11

    अशोक छाबरा: अशोक छाबरा मोठ्या पडद्यावर देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची भूमिका साकारत आहेत. (Photo: Kangana Ranaut/Insta)

  • 7/11

    महिमा चौधरी: ९० च्या दशकातील स्टार अभिनेत्रींपैकी एक महिमा चौधरी या चित्रपटात इंदिरा गांधीं यांच्या निकटवर्तीय सहकारी पुपुल जयकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. (Mahima Chaudhry/Insta)

  • 8/11

    मिलिंद सोमण: मिलिंद सोमण हे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारणार आहेत, जे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय लष्कराचे लष्करप्रमुख होते. (Photo: Milind Soman/Insta)

  • 9/11

    विशाख नायर : विशाख नायर या चित्रपटात इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांची भूमिका साकारत आहे. (Photo: Kangana Ranaut/Insta)

  • 10/11

    सतीश कौशिक: दिवंगत अभिनेते सतीश कौशिक हे भारताचे चौथे उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या वर्षी २०२३ मध्ये त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (Photo: Satish Kaushik/Insta)

  • 11/11

    या स्टार्सशिवाय इतरही अनेक अभिनेते आणि अभिनेत्री या चित्रपटात अनेक ऐतिहासिक व्यक्तींच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. (Photo: Kangana Ranaut/Insta)

TOPICS
कंगना रणौतKangana RanautबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: From atal bihari vajpayee to sanjay gandhi emergency actors will be seen in these historical characters spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.