य
-   सूरज चव्हाण हे नाव आता महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झालं आहे. 
-  आज संपूर्ण महाराष्ट्र त्याला सूरज या नावाने ओळखत असला तरीही, त्याचं मूळ टोपणनाव वेगळंच आहे. 
-  सूरज चव्हाणने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. 
-  सूरजला त्याच्या चुलत्यांनी हे नाव पाडलं होतं. 
-  सूरजचं टोपणनाव आहे ‘कच्च्या’. सगळे गावकरी त्याला याच नावाने हाक मारतात. 
-  याबद्दल सांगताना सूरज म्हणाला, “माझ्या चुलत्याने मला ‘कच्च्या’ नाव पाडलेलं…पण, माझ्या बाबांनी माझं नाव सूरज ठेवलं.” 
-  “आजही माझ्या गावी सगळे मला ‘कच्च्या’ म्हणतात. सगळेजण गावात मला ‘कच्च्या’ म्हणून आवाज देतात पण, आता महाराष्ट्र सूरज म्हणून ओळखतोय.” असं सूरजने सांगितलं. 
-  Bigg Boss नंतर सूरजचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 
-  आता लवकरच हा ‘बिग बॉस’ विजेता केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमात झळकणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सूरज चव्हाण इन्स्टाग्राम )