-
वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू यांच्या ‘सिटाडेल: हनी बनी’ या ॲक्शन-थ्रिलर सिरीजची प्रतीक्षा आता संपली आहे, ही सिरीज ७ नोव्हेंबर २०२४ रोजी Amazon Prime Video वर रिलीज झाली आहे. (Still from Film)
-
राज आणि डीके दिग्दर्शित, ही सिरीज प्रसिद्ध अमेरिकन स्पाय थ्रिलर ‘सिटाडेल’ चा भारतीय रिमेक आहे, ज्यामध्ये प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडन मुख्य भूमिकेत होते. (Still from Film)
-
या मालिकेसाठी सुमारे ४० कोटी रुपयांचे मोठे बजेट वापरण्यात आले आहे. त्याचबरोबर या मालिकेतील कलाकारांनीही त्यांच्या भूमिकांसाठी चांगली रक्कम मानधन म्हणून घेतली आहे. कोणत्या स्टारने किती फी घेतली ते जाणून घेऊ. (Still from Film)
-
वरुण धवन
या मालिकेत वरुण धवनने मुख्य भूमिका साकारली असून त्याने आपल्या भूमिकेसाठी सर्वाधिक फी आकारली आहे. रिपोर्ट्सनुसार, वरुणने या सीरिजसाठी २० कोटींची मोठी रक्कम घेतली आहे. (Photo Source: @varundvn/instagram) -
समांथा रुथ प्रभू
या मालिकेत सामंथा मुख्य भूमिकेत दिसत आहे. सामंथाने तिच्या जबरदस्त अभिनय आणि ॲक्शन सीनसाठी १० कोटी रुपये फी आकारली आहे. (Photo Source: @samantharuthprabhuoffl/instagram) -
केके मेनन
‘सिटाडेल: हनी बनी’मध्ये केके मेननही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील भूमिकेसाठी त्याने दीड कोटी रुपये फी आकारली आहे. (Photo Source: @kaykaymenon02/instagram) -
साकिब सलीम
साकिब सलीम देखील या मालिकेचा एक भाग आहे आणि त्याने त्याच्या भूमिकेसाठी ४० लाख रुपये घेतले आहेत.(Photo Source: @saqibsaleem/instagram) -
सिकंदर खेर
सिकंदर खेरने या मालिकेत शानची भूमिका साकारली असून या भूमिकेसाठी त्याला ५० लाख रुपये मानधन मिळाले आहे. (Photo Source: @sikandarkher/instagram)
४० कोटी रूपये बजेटच्या सिरीजमध्ये वरुण व समांथा मुख्य भूमिकेत, ‘सिटाडेल: हनी बनी’साठी घेतले ‘इतके’ मानधन
Citadel: Honey Bunny : ;सिटाडेल: हनी बनी ही राज आणि डीके दिग्दर्शित अमेरिकन स्पाय-थ्रिलर सिटाडेलची भारतीय रिमेक वेबसिरीज आहे. यामध्ये जबरदस्त ॲक्शन आणि इंटरेस्टिंग स्टोरी पाहायला मिळत आहे.
Web Title: Samantha ruth prabhu varun dhawan and more citadel honey bunny cast salaries revealed spl