-
मागील पाच वर्षांपासून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधतीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत मधुराणीने साकारलेली अरुंधती घराघरात पोहोचली.
-
अनेक महिलांसाठी ती प्रेरणा झाली. अशा या लोकप्रिय अरुंधतीने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’चा ३० नोव्हेंबरला शेवटचा भाग प्रसारित झाला. या मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ नव्या मालिकेने घेतली आहे.
-
२ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ प्रसारित होतं आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदमसह हरीश दुधाडे, प्रतिक्षा जाधव, अदिश वैद्य, पल्लवी कदम असे अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन घेतलं.
-
इन्स्टाग्राम लाइव्हमधून मधुराणीने इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले.
-
लाइव्ह सेशनमध्ये मधुराणी प्रभुलकरला विचारलं की, ‘आई कुठे काय करते’च्या दुसऱ्या पर्वाचा प्लॅन करा.
-
तेव्हा मधुराणी म्हणाली, “‘स्टार प्रवाह’चं अकाउंट आहे. त्यांना हे नक्की पाठवा. त्यांनी जर ठरवलं तर आम्हा सगळ्यांना पुन्हा दुसरं पर्व करायला आवडेल.”
-
सर्व फोटो सौजन्य – स्टार प्रवाह / मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम
Photos: ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची आतापासूनच चर्चा, मधुराणी प्रभुलकर म्हणाली, “‘स्टार प्रवाह’चं…”
‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी मधुराणी प्रभुलकर काय म्हणाली? जाणून घ्या…
Web Title: Madhurani prabhulkar statement about aai kuthe kay karte second season pps