-  

राष्ट्रीय पुरस्कार विजेती दक्षिण भारतीय अभिनेत्री कीर्ती सुरेशने अखेर तिचा दीर्घकाळचा प्रियकर अँथनी थाटीलबरोबर लग्नगाठ बांधली आहे.
 -  
गोव्यामध्ये अत्यंत खाजगी समारंभात त्यांनी लग्न केले.
 -  
अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती साउथ ब्राइडल गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
 -  
कीर्ती आणि अँथनी दोघेही फोटोंमध्ये खूप आनंदी दिसत आहेत, #ForTheLoveOfNyke असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
 -  
दरम्यान, दोघेही एकमेकांना १५ वर्षांपासून ओळखतात आणि आता त्यांनी अधिकृतपणे लग्न केले आहे.
 -  
अँथनी हा केरळमधील कोची येथील व्यापारी असून तो आता दुबईत राहतो.
 -  
या फोटोंमध्ये कीर्ती सुरेश आणि अँथनी थाटील खूपच आनंदी दिसत आहेत.
 -  
दोघेही शाळेत एकत्र शिकत होते आणि नंतर ते एकमेकांना डेट करू लागले. कीर्ती आणि अँथनी यांनी १५ वर्ष डेट केल्यानंतर अखेर गोव्यात आज लग्न केले आहे.
 -  
कीर्ती बेबी जॉन या आगामी चित्रपटात वरुण धवनबरोबर दिसणार आहे. (सर्व फोटो साभार- किर्ती सुरेश इन्स्टाग्राम)
हेही पाहा- KGF अभिनेत्रीनं घेतलं अरुणाचल प्रदेशातील प्रसिद्ध महादेव मंदिरात दर्शन, फोटो व्हायरल 
Photos : दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने दिर्घकाळ प्रियकराशी बांधली लग्नगाठ; कोण आहे तिचा पती, काय करतो?
Keerthy Suresh Wedding Photos: कीर्ती आणि अँथनी यांनी १५ वर्ष डेट केल्यानंतर अखेर गोव्यात आज लग्न केले आहे.
Web Title: South actress keerthy suresh married with longtime boyfriend who is her husband what does he do spl