• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood movies with the most songs see list spl

सर्वाधिक गाणी असलेले बॉलीवूड चित्रपट, ‘या’ एका सिनेमात तब्बल ७० हून अधिक गाणी!

Which Bollywood movie has the most songs? : गाण्यांमुळे बॉलीवूड चित्रपट जास्त मनोरंजक बनतात, पण आज आम्ही तुम्हाला अशा काही चित्रपटांबद्दल माहिती देत आहोत ज्यांनी गाण्यांच्या बाबतीत विक्रमच बनवले होते. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल ज्यात सर्वाधिक गाणी आहेत.

Updated: December 18, 2024 20:27 IST
Follow Us
  • Bollywood movies with the most songs
    1/9

    बॉलीवूड चित्रपटांना त्यातील गाणी हॉलीवूड चित्रपटांपेक्षा वेगळे बनवतात. गेल्या काही दशकांत बॉलीवूड चित्रपटसृष्टीने खूप मोठी मजल मारली आहे. दरम्यान, एक काळ असाही होता की चित्रपटांमध्ये अनेक गाणी असायची आणि प्रत्येक गाण्याची लांबीही बऱ्यापैकी मोठी असायची.

  • 2/9

    पण आज तसे होत नाही. चित्रपटात गरज नसल्यास निर्माते मर्यादित गाणी ठेवतात. दरम्यान, सर्वाधिक गाणी असलेल्या काही हिंदी चित्रपटांची नावे तुम्हाला माहीत आहेत का?

  • 3/9

    हम आपके है कौन
    या यादीत बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या चित्रपटांचीही नावे आहेत. १९९४ मध्ये रिलीज झालेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटानेही गाण्यांच्या बाबतीत रेकॉर्ड बनवले होते. या कौटुंबिक चित्रपटात एक दोन नव्हे तर एकूण १४ गाणी होती.

  • 4/9

    सिलसिला
    १९८१ मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्या ‘सिलसिला’ चित्रपटातही भरपूर गाणी आहेत. या चित्रपटात एकूण १२ गाणी आहेत, त्यापैकी आजही अनेक रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये त्यांना जागा आहे.

  • 5/9

    ताल
    १९९९ मध्ये रिलीज झालेला अनिल कपूर आणि अक्षय खन्ना यांचा चित्रपट ‘ताल’ देखील या यादीत सामील आहे. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटात १२ गाणी होती जी त्यावेळी खूप गाजली होती. चित्रपटाचे टायटल ट्रॅक आजही खूप लोकप्रिय आहे.

  • 6/9

    तेरे नाम
    या यादीत सलमान खानचा आणखी एक चित्रपट आहे. २००३ मध्ये रिलीज झालेला सलमान खानचा सुपरहिट चित्रपट ‘तेरे नाम’ मध्ये देखील एकूण १२ गाणी होती ज्यांना खूप लोकप्रियता मिळाली होती.

  • 7/9

    देवदास
    या यादीत आणखी एक प्रसिद्ध नाव आहे ते म्हणजे शाहरुख खानचा मल्टीस्टारर चित्रपट ‘देवदास’. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात एकूण १० गाणी होती जी खूप लोकप्रिय आहेत.

  • 8/9

    इंद्रसभा
    १९३२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंद्रसभा’ या चित्रपटापात सर्वाधिक गाणी आहेत. Gaana.com च्या रिपोर्टनुसार हा बॉलिवूड चित्रपट आहे ज्यामध्ये सर्वाधिक गाणी होती. निर्मात्यांनी या चित्रपटात तब्बल ७० हून अधिक गाणी समाविष्ट केलेली आहेत.

  • 9/9

    हेही पाहा- ‘या’ बहुप्रतीक्षित १२ भारतीय चित्रपटांची चाहत्यांना आहे आतुरता!

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood movies with the most songs see list spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.